ठाण्यातीस लसीकरणाच्या राजकारणात कॉंग्रेसची उडी, लस ही सर्वसामान्यांची, कॉंग्रेसची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:56 PM2021-10-20T12:56:00+5:302021-10-20T12:56:39+5:30
Corona Vaccine Politics in Thane: ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या लसीकरणाच्या राजकारणात आता कॉंग्रेसने देखील उडी घेतली आहे.
ठाणे - ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या लसीकरणाच्या राजकारणात आता कॉंग्रेसने देखील उडी घेतली आहे. लसीकरणाचे राजकारण थांबवा या मागणीसाठी आणि सर्वसामान्यांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी बुधवारी शहर कॉंग्रेसच्या वतीने महापालिका मुख्यालयाबाहेर धरणो आंदोलन करण्यात आले.
मागील काही दिवसापासून शहरात लसीकरणाचे राजकारण चांगलेच तापले आहे. कळव्यात शिवसेनेने लसीकरण मोहीम घेऊन राष्ट्रवादीला चपराक देण्याचा प्रयत्न केला असतांना दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील कोपरी पाचपाखाडी मतदार संघात लसीकरण घेण्यासाठी महापौरांकडे परवानगी मागितली आहे. त्यानंतर आता कॉंग्रेसने देखील उडी घेतली असून त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते. व्हॅक्सीन ही सर्वसामान्य जनतेची असल्याने ती त्यांनी उपलब्ध झालीच पाहिजे, लसीकरणाचे राजकारण बाजूला ठेवा, लस नाही कोणाच्या बापाची ती ठाणेकरांच्या हक्काची अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोरोना आटोक्यात येत असतांना लसीकरण मोहीम विशिष्ट हेतून राबविली जात असल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. त्यातही महापौरांच्या दालनात जाऊन आंदोलन करणे चुकीचे असल्याचे सांगत यावेळी कॉंग्रेसने राष्ट्रवादीवर टिका देखील केल्याचे दिसून आले. लस ही जनतेच्या पैशातून येत असल्याने त्यातून स्वत:चे जाहीरातबाजी केली जात आहे, स्वत:चे बॅनर लावले जात आहेत, हे अतिशय चुकीचे असल्याचे मतही यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिका:यांनी व्यक्त केले. त्यातही हे यावेळी या आंदोलनात कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, सचिन शिंदे आदींसह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.