उल्हासनगरात काँग्रेसची भारत जोडो वर्धापनदिन निमित्त पदयात्रा
By सदानंद नाईक | Published: September 9, 2023 06:14 PM2023-09-09T18:14:59+5:302023-09-09T18:15:18+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३, नेहरू चौक येथील पंडित नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, पदयात्रेस सुरवात झाली.
उल्हासनगर : भारत जोडो अभियानाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहर काँग्रेसच्या वतीने पदयात्रेचे आयोजन केले होते. पदयात्रेत पक्षाचे नेते युसुफ अब्राहनी, शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उल्हासनगर कॅम्प नं-३, नेहरू चौक येथील पंडित नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, पदयात्रेस सुरवात झाली. पदयात्रा गजानन मार्केट, सिरू चौक मार्गे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम मढवी यांच्या कार्यालय येथे जाऊन, पदयात्रा समाप्त झाली. यावेळी झालेल्या कॉर्नर सभेत पक्षाच्या नेत्यांनी।मोदी सरकारच्या कारभारावर व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक असून देशातील द्वेषाचे वातावरण कमी करण्यासाठी पक्षाचे नेते राहुल गांधी प्रयत्न करीत असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली.
काँग्रेस पक्षाचे नेते युसुफ अब्राहनी यांनी काँग्रेस काळात ३५० रुपयांना मिळणारे सिलेंडर, मोदींच्या काळात ११०० रुपयात विकले जात असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सिलेंडरात २०० रुपये कपात केले आहे. देशाला अखंडित ठेवण्यासाठी व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी राहुल गांधीं यांची भारत जोडो यात्रा महत्वाची व ऐतिहासिक असल्याचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितले. यावेळेस माजी आमदार युसुफ अब्राहणी, शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे, सफाई कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष राधाचरण करोतीया, अझरुद्दीन खान, किशोर धडके, रोहित जुरयाने,नफामिदा शेख, राजेश मल्होत्रा, अहमद खान, नियाज खान, प्रा नारायण गेमनानी, टी एम राय, शंकर आहुजा, मनीषा महाकाळे, सिंधुताई रामटेके, विशाल सोनवणे, राकेश मिश्रा, निलेश जाधव, धीरज पाटोळे, संतोष मिंडे, दीपक सोनवणे, आबा साठे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तिथ होते.