उल्हासनगर : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी नेताजी चौकात आंदोलन केले. यावेळी सह्याची मोहीम राबवून पंतप्रधान मोदी यांना हिटलर यांचा फोटो यांचा फोटो पाठविणार असल्याचा निर्धार काँग्रेसने घेतला.
उल्हासनगर कॅम्प नं-५ नेताजी चौकात शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते राहुल गांधी विरोधात केंद्रातील मोदी सरकार खोट्या केसेस करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. देशातील जनतेचे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारू नयेत, यासाठी त्यांची खासदारकी रद्द करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचे रोहित साळवे म्हणाले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मोदी सरकार महाघोटाळा करणाऱ्या अदानीला वाचवत असून, राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळ काढत आहे. देशात हिटलर प्रमाणे हुकूमशाहीचा कारभार चालू आहे. काँग्रेस नेते सरदार पटेल यांचा पुतळा उभारून खोट्या लोकशाहीचे नाटक बंद करावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आदर्श असणाऱ्या हिटलरचा पुतळा आपल्या भाजपा पक्षाच्या मुख्य कार्यालयात उभारावा. असे शहराध्यक्ष साळवे यांनी सांगितले.
शहर काँग्रेसकडून हिटलरच्या पुतळ्याची प्रतिकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात रोहित साळवे यांनी सांगितले. आंदोलनात किशोर धडके, नानीक आहुजा, सुनिल बहराणी, वजीरुदिन खान, आसेराम टाक, कुलदीप आयलसिंघानी, अजिज खान, अहमद खान, साबुद्धिन खान, महादेव शेलार, अमर जोशी, डॉ. धीरज पाटोळे, दीपक गायकवाड, मुन्ना श्रीवास्तव, महेश मिरानी विशाल सोनवणे, सुशील सैनी, दीपक सोनोने, अख्तर खान, अन्सार अहमद, राकेश मिश्रा, प्राण सरोज, अनिल यादव, नीयाज खान, आबा साठे, सुनिल करोतिया, चिराग फक्के, राजमोहन नायर, भारती फुलवरिया, फामिदा सय्यद, विद्या शर्मा, उषा गिरी,राजू नारा, अनिल सिन्हा , मनोहर मनुज , पवन मिरानी यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.