भिवंडीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे आंदोलन
By नितीन पंडित | Published: March 30, 2024 06:17 PM2024-03-30T18:17:12+5:302024-03-30T18:19:01+5:30
काँग्रेस पक्षाचे बँक खाते सिल केल्या नंतर आयकर विभागाने काही व्यवहार रोखीने केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाला १७०० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे.
भिवंडी: केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात शनिवारी काँग्रेसचेभिवंडी शहराध्यक्ष तथा माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन केले.
काँग्रेस पक्षाचे बँक खाते सिल केल्या नंतर आयकर विभागाने काही व्यवहार रोखीने केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाला १७०० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. यामुळे एन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षात खळबळ उडाली असून केंद्र सरकार व भाजपा पक्षाकडून शासन यंत्रणेचा गैरवापर करून ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस कडून केला जात आहे.
शहरात काँग्रेस पक्षाच्या कार्यालया समोर काँग्रेस शहर अध्यक्ष रशीद ताहीर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.