केंद्र सरकार, ईडी विरोधात काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन

By सुरेश लोखंडे | Updated: April 17, 2025 17:09 IST2025-04-17T17:07:08+5:302025-04-17T17:09:03+5:30

या आंदाेलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

congress protest in thane against central government and ed | केंद्र सरकार, ईडी विरोधात काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन

केंद्र सरकार, ईडी विरोधात काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आराेपासह द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनियागांधी, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधीं,अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह इतर जेष्ठ नेते मंडळींवर चार्जशीट दाखल करण्याच्या आराेपाखाली ठाण्यातील काॅंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदाेलन करून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी या आंदाेलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

देशभरातील ईडी कार्यालयाबाहेर काॅंग्रेसने आंदोलने केली जात आहेत, त्यास अनुसरून ठाण्यातही या काॅग्रेसच्या कार्यकत्यांनी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे,प्रदेश पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यात कोकण सहप्रभारी यु बी व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट नाका येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी संतोष केणे, ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे, कल्याण शहर अध्यक्ष सचिन पोटे, उल्हासनगर चे अध्यक्ष रोहित साळवे, भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल रशीद ताहीर मोमीन ,ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध फ्रंटल व सेलसह सर्व स्तरातील काँग्रेस पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित राहून ठाणे जिल्हाधिकारी कार्यलायाबाहेर आंदाेलन छेडले.

Web Title: congress protest in thane against central government and ed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.