लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला ३० मे रोजी सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या सात वर्षांच्या कार्यकाळात देशाची झालेली अपरिमित पिछेहाट झाली असल्याचा आरोप करून ठाणे मध्यवर्ती कॉग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करीत भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने केली.केंद्रातील भाजप सरकारला रविवारी सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार रविवारी महाराष्टÑभर भाजप सरकारच्या अपयशावर बोट ठेवून निदर्शने करण्यात आली. ठाण्यातही याचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या पाश्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून हे आंदोलन केले. कोरोना संक्र मण रोखण्यासाठी तसेच लसीकरणात आलेले अपयश, पेट्रोल-डीझेलचे वाढते दर, देशातील ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेतकरी विरोधी काळे कायदे आदी बाबींवर आलेला अपयशाचा पाढा वाचला. तसेच मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.याप्रसंगी ठाणे जिल्हा इंटक अध्यक्ष तसेच सरचिटणीस सचिन शिंदे, प्रदेश काँग्रेस सदस्य राजेश जाधव, सुरेश पाटील खेडे, सुखदेव घोलप, संजय घाडीगावकर आणि महिला अध्यक्षा शिल्पा सोनोने, रेखा मिरजकर आणि स्वाती मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.‘ मोठ्या विश्वासाने सात वर्षापूर्वी देशातील नागरिकांनी बहुमताने मोदी सरकारकडे सत्तेच्या चाव्या दिल्या. परंतू, काही मूठभर लोकांसाठी प्रत्येक स्तरातील नागरिकांचा विश्वासघात करण्यात आला. सध्या देशातील वाढती महागाई, बेरोजगारीमुळे देश २० वर्ष मागे गेला. याला पूर्णपणे केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार जबाबदार असून याचा तीव्र निषेध आम्ही व्यक्त केला.’विक्र ांत चव्हाण , अध्यक्ष, ठाणे शहर काँग्रेस.
ठाण्यात केंद्र सरकारच्या सातव्या वर्षपूर्ती विरोधात काँग्रेसची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 11:22 PM
केंद्रातील भाजप सरकारला रविवारी सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार रविवारी महाराष्टÑभर भाजप सरकारच्या अपयशावर बोट ठेवून निदर्शने करण्यात आली. ठाण्यातही याचे तीव्र पडसाद उमटले.
ठळक मुद्दे ठाण्यात केंद्र सरकारच्या सातव्या वर्षपूर्ती विरोधात काँग्रेसची निदर्शने