भिवंडीत इंधन दर वाढीची अंत्ययात्रा काढून काँग्रेसचे निदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 06:33 PM2022-04-01T18:33:58+5:302022-04-01T18:35:07+5:30
एप्रिल फुल म्हणत मूर्ख बनविण्याचा दिवस म्हणून एक एप्रिल साजरा केला जातो, देशात खऱ्या अर्थाने मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनविले आहे.
नितिन पंडीत -
भिवंडी- घरगुती आणि व्यवसायिक गॅस, पेट्रोल तसेच डिझेलची दरवाढ सुरूच आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशभरात आंदोलन केले जात आहे. भिवंडीत युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल छगन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नारपोली येथील नॉर्दन पेट्रोल पंप येथे गॅस सिलेंडरची तिरडी काढून शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी राणी अग्रवाल, अल्पसंख्याक विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष जव्वाद चिखलेकर, सोहेल खान, गीता चौधरी, इकबाल अहमद यांसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एप्रिल फुल म्हणत मूर्ख बनविण्याचा दिवस म्हणून एक एप्रिल साजरा केला जातो, देशात खऱ्या अर्थाने मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनविले आहे. दररोज होणारी पेट्रोल दरवाढ वाहतूक व्यवस्थेचे कंबरडे मोडणारी असून त्याचे चटके सर्वसामान्य जनतेला सोसावे लागत असल्याची टीका युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल पाटील यांनी केली आहे.