VIDEO: मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 05:04 PM2020-09-16T17:04:31+5:302020-09-16T17:07:59+5:30
मोदी सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; निर्यातबंदी हटवण्याची मागणी
ठाणे: कोरोना संकटामुळे जर्जर झालेल्या देशांतील शेतक-यांनी प्रचंड मेहनत करून मोठया प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले व आता कांदा परदेशात निर्यात करून हातात चार पैसे मिळण्याची वेळ आली असता घुमजाव करित केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा जाचक निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत याविरोधात ठाण्यात काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्या, शेतकऱ्यांना न्याय द्या; मोदी सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/FVWbvm3HhO
— Lokmat (@MiLOKMAT) September 16, 2020
भाजप सरकारच्या या दुर्दैवी निर्णयामुळे शेतक-यांवर घोर अन्याय झाला आहे.याचा जाब विचारण्यासाठी ठाणे काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर निदर्शने कऱण्यात आली. देशाची आर्थिक परिस्थिती आधीच ढसाळली आहे त्यात शेतकरी देखिल हवालदिल झाला असताना केंद्र सरकारने बाहेर जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्यानंतर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येईल त्यामुळे संपूर्ण देशात आंदोलन सुरूच आहे मात्र ठाण्यातही यापुढे मोठे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.