ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 6 - केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या नोटबंदी विरोधात काँग्रेसच्यावतीने देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. ठाणे शहर (जि.) काॅग्रेस कमिटीच्यावतीनेही आज जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट न झाल्यामुळे सतंप्त झालेल्या कार्यकर्त्यांसह नेत्यानी कार्यालयातच तासभर ठिय्या धरला.
""मोदी सरकार हाय हाय"" भा.ज.पा.सरकार मुर्दाबाद "" आदी घोषना कार्यकर्ते देत होते. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला व भेटण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकार्याच्या कार्यालयातच तासभर ठिय्या आंदोलन केले.
या प्रंसगी काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह नोटाबदी आंदोलनाचे प्रभारी व गुजरातचे आमदार अश्विन कोतवाल, प्रदेश सरचिटणीस व प्रभारी तारिक फारुकी,माजी खासदार आय्.जी. सनदि,प्रदेश काँग्रेस सचिव बाळकृष्ण पूर्णेकर व सजंय चौपाने, के.वृषाली,नगरसेवक यासिन कुरेशी,विक्रांत चव्हाण,प्रदिप राव,परिवहन समीती सदस्य सचिन शिंदे,महिला अध्यक्षा शिल्पा सोनोने,सेवादल अध्यक्ष शेखर पाटील,युवक काँग्रेसचे किशोर कांबळे,जगदिश गौरी,भरत पडवळ,सरचिटणीस विजय हिरे पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.