उल्हासनगरात काँग्रेसचा महिला मेळावा
By सदानंद नाईक | Published: February 16, 2024 04:21 PM2024-02-16T16:21:56+5:302024-02-16T16:23:24+5:30
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आदींच्या जीवनावर प्रबोधनकार माहिती महिलांना दिली आहे.
उल्हासनगर : शहर जिल्हा महिला काॅग्रेस व निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागातर्फे महिला मेळाव्याचे आयोजन लालचक्की येथील सार्वजनिक हॉल मध्ये केले होते. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आदींच्या जीवनावर प्रबोधनकार माहिती महिलांना दिली आहे.
उल्हासनगर काॅग्रेस महिला अध्यक्षा मनीषा महाकाळे व निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग अध्यक्षा प्रा सिंधु रामटेके यांच्या संकल्पनेतून उल्हासनगर कांग्रेस जिल्हा अध्यक्ष रोहित सालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक हाॅल लालचक्की येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्यावरील विषयावर प्रबोधन करण्यात आल्याची माहिती यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली. काँग्रेस महिला विंगच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महानायीकांचे स्मरण करुन, महिलांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले.
महिलांना संविधानाचे वाचन करून शपथ देण्यात आली. मेळाव्यात महिलांनी पारंपरिक झिम्मा व फुगडी खेळून आपला आनंद साजरा केला. पक्षाच्या माजी नगरसेविका व गटनेता अंजली साळवे, माजी मुख्याध्यापीका विजया मोरे, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा टिना ठाकुर , विशाल सोनावणे, संतोष मिंडे, दीपक सोनावणे, राकेश मिश्रा, अनिल यादव, अन्सार शेख, मंगेश हिवराळे, पुषोत्तम महाडिक तसेच काॅग्रेसच्या जेष्ठ पदाधिकारी कमलताई वेलकुंडे, सचिव मालती गवई, कालिंदी गवई, विजया गाडे, सुधा जोगळेकर, मानसी पाटकर, मदीना शेख, मनीषा नगारे, कुसुम महाकाळे, संध्या महाकाळे, आशा कोलगे, मेघा कोलगे, दिपा महाकाळे, काजल महाकाळे आदीसह एकून ९५० पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.