शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

कर्मचारी हक्कासाठी काँग्रेस सरसावली

By admin | Published: April 29, 2017 1:32 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेत बुधवारी काँग्रेसची नवीन कर्मचारी संघटना स्थापन झाली. या संघटनेसह पालिकेत सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांसाठी एकूण सहा संघटना झाल्या आहेत.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत बुधवारी काँग्रेसची नवीन कर्मचारी संघटना स्थापन झाली. या संघटनेसह पालिकेत सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांसाठी एकूण सहा संघटना झाल्या आहेत.माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्या हस्ते नवीन संघटनेचा पाया रोवण्यात आला. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या (इंटक) बॅनरखाली सुरू केलेली नवीन संघटना कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले. यानंतर, आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासोबत हुसेन यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा पाढा वाचण्यात आला. त्याचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. या नवीन संघटनेसह पालिकेत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एकूण सहा संघटना कार्यरत झाल्या आहेत. त्यात इंटकसह माजी आ. विवेक पंडित यांची श्रमजीवी संघटना, सेनेची कामगार सेना, मनसेची कामगार सेना, रयत राज्य कामगार संघटना व आमदार नरेंद्र मेहताप्रणीत श्रमिक जनरल कामगार संघटनेचा समावेश आहे. रयत राज्य कामगार संघटना नवीन नेतृत्वाच्या शोधात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यातील सभासद कामगार सेना किंवा श्रमजीवी संघटनेत विलीन होण्याचे संकेत दिले जात आहेत. संघटना बदलाचे वारे वाहत असतानाच पालिकेत इंटकचा शिरकाव झाला आहे. (प्रतिनिधी)