शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कोसबाड-वरठा नाल्यावर नवीन पूल बांधा; विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 7:38 AM

वरठापाड्याच्या नाल्यावर पूल नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यात नाला ओलांडताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

- आरिफ पटेलमनोर : पालघर तालुक्यातील पूर्वेकडील दुर्गम भागातील कोसबाड-वरठा पाड्यातील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढावा लागतो, या संदर्भात मंगळवारी (४ जून) ‘जीव मुठीत घेऊन आदिवासींचा नाल्यातील धोकादायक प्रवास’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती.  या बातमीची दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना तसेच पालघर जिल्हाधिकारी यांना त्या नाल्यावर नवीन पूल बांधण्याचे पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे, ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अतिदुर्गम, आदिवासी परिसरातील मौजे कोसबाड येथील वरठापाड्याच्या नाल्यावर पूल नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यात नाला ओलांडताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पूल मंजूर असूनही २० वर्षांपासून तो लालफितीत अडकला असल्याने प्रसिद्ध झाले आहे. तेथील आदिवासी शाळकरी विद्यार्थी, गर्भवती माता व ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी पालघर तालुक्यातील कोसबाड-वरठापाडा येथील नाल्यावर नवीन पूल बांधण्याबाबत जिल्हा नियोजन समिती वा इतर निधींच्या माध्यमातून पुलाच्या बांधकामास मंजुरी देऊन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे