वासिंद : सारमाळ नदीच्या पात्रात जेएसडब्ल्यू (जिंदाल) कंपनीने बांधकाम केल्यामुळे पर्यावरणाची हानी हाेणार आहे. याबाबत त्वरित याेग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात जेएसडब्ल्यू कंपनीचे वासिंदच्या हद्दीत जेटीएमएस तसेच जेएसडब्ल्यू स्टील व पेण्ट असे दोन प्लांट आहेत. मुंबईच्या दिशेने म्हणजे कंपनीच्या पश्चिमेकडील बाजूला सारमाळ नदीच्या पात्रात या कंपनीने संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. या बांधकामामुळे नदीच्या नैसर्गिक पात्राला धोका संभवतो. त्यामुळे महसूल विभागाने याठिकाणी त्वरित पाहणी करून हे बांधकाम काढून कंपनी व्यवस्थापनावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चिन्मय पालेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, हे बांधकाम भूमिअभिलेख कार्यालयाच्या मोजणीनुसार नदीपात्र सोडून केलेले असल्याचे त्यांनी सांगितले.
काेट
सारमाळ नदीच्या पात्रात केलेल्या बांधकामाची त्वरित पाहणी करण्यात येईल. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. त्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
- पी.बी. पाटील, तलाठी, वासिंद.