किन्हवली : चेरपोली ग्रामपंचायत हद्दीतील एकूण पाच प्रभागासह चेरपोली व बामणे या दोन महसुली गावातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी चेरपोली ग्रामपंचायत खेळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गाव,आदिवासी पाडे व शहापूर शहरात समाविष्ट असणाऱ्या अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या राहुलनगर, यमुनानगर, साईनगर पंराजपे नगर, किसनबाबा नगर व द्वारकानगर यासह अनेक प्रभागातील चेरपोली ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून त्यामुळे साथीचे रोग वाढत आहेत. हे पाणी भांडीकुंडी व कपडे धुण्यासाठीही योग्य नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत हद्दीत अगोदरच पाण्याची वानवा असणाºया या प्रभागामध्ये एकतर चार-पाच दिवसातून पाणी येते आणि तेही पिण्यायोग्य नसल्याने येथील रहिवाशांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.प्रशासनाकडूनही साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणाही सक्षम नसल्याचे चित्र आहे.
चेरपोली, बामणेमधील वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारे शहरीकरण लक्षात घेऊन नवीन पाणी योजनेच्या मंजुरीसाठी चार लाख ८४ हजार तरतूद आहे . - शरद फर्डे, ग्रामविकास अधिकारी
राहुलनगर येथील नागरिकांना चार ते पाच दिवसातून पिण्याचे पाणी येते. आता पावसाळ््यात दूषित पाणी येत असून ते पाणी पिण्यायोग्य नाही. ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा. - राकेश वारघडे, रहिवासी