ठाणे : जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसह येथील सिव्हील रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांवर अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. दीर्घकाळपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलनास बुधवारपासून प्रारंभ केला. गुरुवारीही काळ्याफिती लावून कार्यालयात उपस्थित असलेल्या या कर्मचा-यांनी कोणतेही काम केले नाही.सुमारे ४०० कर्मचारी-अधिकाºयांनी गुरुवारपासून असहकार सुरू करून कामबंद आंदोलन झेडले. दरम्यान त्यांनी काळ्याफिती लावल्या आहेत. या कर्मचाºयांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कर्मचाºयांचा अभ्यास समिती अहवाल शासनास देण्यात यावा, कर्मचाºयांना कामावरून काढू नये, शासन सेवेत कायम करा, कायम होईपर्यंत समान काम - समान वेतन द्यावे, आशा कार्यकर्ती आणि आशा गट प्रवर्तक यांना न्यूनतम मानधन देण्यात यावे, विमा संरक्षण लागू करा, बदली धोरण लागू करा, ईपीएफ सुरू करा आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले.>राज्यभरात आंदोलनराज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनाचे पडसाद ठाण्यातही उमटले. अधिकारी व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मनिष खैरनार यांच्यासह सचिव प्रदीप पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 3:07 AM