शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोरोनाकाळात रुग्णवाहिका भाडेठेक्यात ठेकेदाराची ‘बरकत’; ११ महिन्यांसाठी ४ कोटी ९८ लाख

By धीरज परब | Published: March 18, 2024 1:16 PM

महत्त्वाची बाब म्हणजे हे सारे व्यवहार शासन दर डावलून करण्यात आले

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: कोरोना काळात शासनाने आयसीयू वा वातानुकूलित रुग्णवाहिकेची १ हजार १९० रुपये भाडेदर निश्चित केला होता. असे असताना महापालिकेने मात्र ठेकेदारास १ हजार ८०० रुपयांनी भाडे देऊन ‘बरकत काॅन्ट्रॅक्टर्स’ या ठेकेदारास ११ महिन्यांचे ४ कोटी ९८ लाख रुपये देऊन चांगलीच ‘बरकत’ केल्याचे उघडकीस आले आहे. 

कोरोनाकाळात रुग्णांना रुग्णालय वा कोविड केअरमध्ये ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज होती.  मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणच्या १९ जून २०२० रोजीच्या बैठकीत रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले होते. त्यात २५ किमी अंतर किंवा २ तासांकरिता आयसीयू अथवा वातानुकूलित रुग्णवाहिकेचे भाडे १ हजार १९० रुपये, तर २५ किमी वा २ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यास प्रतिकिमी २४ रुपये निश्चित केले होते.   

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या सौरभ अग्रवाल यांच्या बरकत कॉन्ट्रॅक्टर्स नावाच्या कंपनीने २ जुलै २०२०  रोजी मीरा भाईंदर महापालिकेस पत्र देत कोरोना बाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या शासकीय दराप्रमाणे रुग्णवाहिका पुरवठा करण्यास इच्छुक आहोत, असे पत्र २०१३ सालच्या मंजूर नसलेल्या दरासह दिले होते. 

त्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या पत्रावर प्रस्ताव तयार करून बरकत कॉन्ट्रॅक्टरकडून भाड्याने रुग्णवाहिका घेण्यास त्याने दिलेल्या दरानुसार मंजुरी दिली. ३ जुलै रोजी बरकत कॉन्ट्रॅक्टरला १२ रुग्णवाहिका पुरवठा करण्याचे कार्यादेश तत्कालीन अतिरिक्त आयुक्त महेश वरूडकर यांनी दिले. 

प्रतीक्षा काळ म्हणून मोजले लाखो रुपये

  • पालिकेने १९ जून २०२०च्या मंजूर असलेल्या दराऐवजी मंजूर नसलेल्या दरानुसार ठेकेदारास १० किमीपर्यंत वातानुकूलित वा आयसीयू रुग्णवाहिकेसाठी १ हजार ८०० रुपये तर प्रतीक्षा काळाच्या प्रत्येक तासाला १०० रुपये प्रमाणे कंत्राट दिले. 
  • त्यानुसार ३ जुलै २०२० ते ८ जून २०२१ या काळात बरकत कॉन्ट्रॅक्टरला पालिकेने रुग्णवाहिका भाडे पोटी ४ कोटी ९८ लाख १९ हजार रुपये अदा केले. 
  • त्यात ठेकेदारास प्रतिफेरीप्रमाणे भाडे देण्यात आलेच शिवाय रुग्णवाहिकेचा प्रतीक्षा काळ म्हणून सुद्धा लाखो रुपये मोजले. 
  • याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी रुग्णवाहिका भाडे घोटाळ्याबद्दल पालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
टॅग्स :mira roadमीरा रोड