शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बिले घेण्यासाठी कंत्राटदारांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 2:25 AM

अंबरनाथ पालिका : अधिकारीही जुंपले कामात

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेत दोन दिवसांपासून कंत्राटदारांनी बिले काढण्यासाठी घाई सुरू केली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील बिले देण्यासाठी पालिकेने आर्थिक तरतुदीनुसार बिले काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून नागरिकांपेक्षा कंत्राटदारांची गर्दी कार्यालयात दिसत आहे. तर, जास्तीतजास्त बिल निघावे, यासाठी कंत्राटदारांची लॉबी काम करत आहेत.

नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पालिकेतील कंत्राटदारांनी प्रलंबित बिल मिळावे, यासाठी लागलीच पाठपुरावा सुरू केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून जे ३४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे, त्याच्यावर डोेळा ठेवत कंत्राटदारांनी आणि या कंत्राटदारांना पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. अनेकांची प्रलंबित बिले लागलीच मिळावीत, यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. जुन्या अर्थसंकल्पातील ज्या तरतुदी शिल्लक आहेत, ते बिल घेण्यासाठी पालिकेत धावाधाव सुरू आहे. पालिकेतील अर्थ विभागही याच कामात व्यस्त झाला आहे.

नियमानुसार बिल काढण्याचे प्रयत्न पालिकेच्या वतीने सुरू आहे. तर, दुसरीकडे राजकीय दबावाला बळी न पडता नियमाप्रमाणे बिल काढण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत कोणत्या कंत्राटदाराला कितीचे बिल दिले आणि कोणती लॉबी यशस्वी झाली, हे बिल मंजूर झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.अर्थसंकल्पच मंजूर नाहीदुसरीकडे पालिकेचा नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अजूनही जिल्हाधिकाºयांनी मंजूर केलेला नाही. हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर त्यानुसार अनेक बिले द्यावी लागणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर होण्याआधी ज्या कंत्राटदारांना बिल मिळणार नाही, त्या कंत्राटदारांना नवीन अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर मे महिन्यात बिल दिले जाणार आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे