शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

मालमत्ता सर्वेक्षणासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडून कोट्यवधींचे कंत्राट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:27 PM

मीरा भाईंदर महापालिकेने नागपूरच्या ठेकेदारास शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण, मोजणी आदी करण्यासह मालमत्ता देयकांची छपाई, वितरण आदींचा ठेका ५ वर्षांकरीता दिला आहे.

- धीरज परबमीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेने नागपूरच्या ठेकेदारास शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण, मोजणी आदी करण्यासह मालमत्ता देयकांची छपाई, वितरण आदींचा ठेका ५ वर्षांकरीता दिला आहे. सर्वेक्षणासाठी तब्बल १८ कोटी ६६ लाख रुपये, तर ५ वर्षांच्या मालमत्ता देयकांसाठी २५ कोटी रुपये ठेकेदारास दिले जाणार आहेत. नागपूरच्या ठेकेदारास कोट्यवधींचा ठेका देताना, पालिकेने कर विभागाचे जवळपास खाजगीकरणच करुन टाकले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोट्यवधी रुपये मोजूनही ठेकेदाराकडून प्रत्येक मालमत्तेचे सर्वेक्षण केले जात नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.मीरा भार्इंदर महापालिकेच्या लेखी २ लाख ८१ हजार ८१६ निवासी वापराच्या मालमत्ता आहेत. वाणिज्य वापराच्या ५६ हजार ४५, तर संमिश्र वापराच्या मालमत्तांची संख्या ४ हजार ५८७ इतकी आहे. अशा एकूण ३ लाख ४२ हजार ४४८ मालमत्ता पालिकेच्या लेखी करपात्र आहेत. महापालिकेचा कर विभाग कार्यरत असून, नविन मालमत्तांच्या कर आकारणीसाठी भोगवटादार स्वत:हूनच पालिकेत धाव घेत असतात. मालमत्तांचे क्षेत्रफळ तसेच प्रत्यक्ष वापरात फरक असल्याची काही प्रकरणेदेखील समोर येत असतात.मालमत्तांची पडताळणी, मोजणी, आकारणीपासून देयके छापून त्याचे वितरण व वसुली महापालिका करत आली आहे. आता पालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपने शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणासह ५ वर्षांकरीता मालमत्ता करांची देयके छपाई आदीचे काम खाजगी ठेकेदारास दिले आहे. नागपूरच्या मे. कोलब्रो ग्रुपला हे कंत्राट देण्यात आले आहे. ठेकेदाराने पालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण करणे, मोजमाप घेणे, मालमत्तेचे नकाशे काढणे, फोटो काढणे, जीआयएस प्रणालीवर आधारीत क्रमांकण करणे, करयोग्य मुल्य व भांडवली मुल्यावर आधारित गणना करणे आदी कामे ठेकेदाराने स्वत:चे कर्मचारी लावून करुन द्यायची आहे. या कामासाठी प्रत्येक मालमत्तेमागे ठेकेदारास ५४५ रुपये दिले जाणार आहेत. पालिकेच्या लेखी असलेल्या ३ लाख ४२ हजार ४४८ इतक्या मालमत्तांची संख्या विचारात घेता यासाठी ठेकेदारास १८ कोटी ६६ लाख ३४ हजार रुपये पालिकेला करदात्या जनतेच्या खिशातून मोजावे लागणार आहेत. केवळ सर्वेक्षणाचेच काम नव्हे तर मालमत्ता कराची देयके छपाई, मागणी रजिस्टर, आकारणी रजिस्टर आदींची छपाई, देयकांचे वाटप तसेच देखभाल दुरुस्तीचे कामसुध्दा तब्बल ५ वर्षांसाठी याच ठेकेदारास देण्यात आले आहे. देयक छपाई आदी कामासाठीदेखील महापालिका प्रती देयकामागे १४५ रुपये याप्रमाणे ठेकेदारास वर्षाला तब्बल ४ कोटी ९६ लाख ५५ हजार रुपये मोजणार आहे. म्हणजेच एकूण ५ वर्षांसाठी २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेकेदाराला दिली जाणार आहे.नागपूरच्या ठेकेदारास तब्बल ४३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कंत्राट दिले असताना दुसरीकडे ठेकेदाराकडून मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात हातचलाखी केली जात असल्याचे उघड झाले आहे. इमारतींमध्ये प्रत्येक सदनिकेची मोजणी न करताच ठेकेदाराकडून केवळ पहिल्या वा तळमजल्याच्या सदनिकांची मोजणी करुन त्यावरील मजल्यांच्या सदनिकांची मात्र मोजणी न करताच केवळ माहिती भरुन घेतली जात आहे.निविदेला अद्याप महासभेची मंजुरी मिळालेली नाहीतळ वा पहिल्या मजल्यावरील सदनिकांपासून वरच्या मजल्यावरील सदनिकांचे क्षेत्रफळ सारखेच असल्याचा हवाला देऊन हा प्रकार केला जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने इमारतींमधील सदनिकांचे काटेकोर सर्वेक्षणच झाले नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. इतकेच नव्हे तर, प्रत्येक मालमत्तेचे छायाचित्रदेखील घेतले जात नाही. इमारतीचे वा बैठ्या स्वतंत्र मालमत्तेचे छायाचित्र बाहेरुनच घेतले जात आहेमालमत्तेत भोगवटादार मालक आहे की भाडेकरु, याचा तपशीलदेखील घेतला जात नाही. महापालिका आणि सत्ताधारी भाजपकडून मात्र सदर सर्वेक्षणामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असल्याचा दावा केला जात आहे. नागरिकांसह विरोधी पक्षाने मात्र महापालिकेचे ठेकेदारीकरण सुरु असून ठेकेदाराच्या आड कोणाकोणाच्या तुंबड्या भरल्या जाणार आहेत, असा खोचक सवाल केला आहे. इतक्या मोठ्या कामाची निविदा स्थायी समितीने मंजुर केली असली तरी त्याला महासभेची मंजुरी अद्यापही घेण्यात आलेली नाही.कर लावतेवेळी करदाते नागरिक जे मोजमाप देतात ते ग्राह्य धरुन कर लावला जातो. मात्र नंतर त्यात अनेक जण वाढिव बांधकाम करतात, तसेच वापरात बदलही करतात. शिवाय काहींना आजही करआकारणी लागू केलेली नाही. त्यामुळे अशा मालमत्ता शोधून करआकारणी करणे व पालिकेच्या उत्पनात वाढ करणे हाच सत्ताधारी म्हणून आमचा उद्देश आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात ५० ते ६० टक्के वाढ होऊन वर्षाला १०० कोटी रुपये जास्त मिळतील.-ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक, भाजपसर्वेक्षण करताना ठेकेदाराकडून इमारतींमध्ये प्रत्येक सदनिकेचे मोजमाप व फोटो काढले जात नसल्याची तक्रार आली असून, तसे ठेकेदारास त्वरित कळवले आहे. ठेकेदाराकडून आलेल्या तक्रारीच्या मालमत्तेचे प्रत्यक्ष जाऊन मोजमाप घेतले आहे. ठेकेदाराला समज दिली असून, पालिका काटेकोर पडताळणी केल्यावरच ठेकेदारास देयक अदा करणार आहे.-गोविंद परब, कर निर्धारक व संकलकपालिकेचे कर्मचारी असताना सत्ताधारी भाजपने केवळ ठेकेदारी पोसून स्वत:ची पोळी भाजण्याचा धंदा चालवला आहे. या ठेकेदारावर इतकी मेहरबानी दाखवण्याचे कारण काय आहे, हे तपासले पाहिजे. माझ्या प्रभागात तर अजूनही सर्वेक्षणाला कोणी आलेले नाही. ४० - ४५ कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात घालून भाजपने नागरिकांच्या पैशांची लूट चालवली आहे. पालिकेचे नव्हे तर ठेकेदार आणि त्यांचे हितसंबंध गुंतलेल्यांचे उत्पन्न वाढवण्याचा हा प्रकार आहे.-निलम ढवण, नगरसेविका, शिवसेना

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकTaxकर