बदलापूर: बदलापुरात एका पाठोपाठ दोन कंपन्यांना आग लागली. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
शनिवारी दुपारी १२.५५ वा.च्या सुमारास बदलापूर एमआयडीसीतील डी के केमिकल्स कंपनीत आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या कंपनीत असलेल्या ज्वलनशील पदार्थांना आग लागल्यामुळे आग भडकण्याचा धोका होता. त्यामुळे कंपनीतील अग्निशमन यंत्रणा व अग्निशमन वाहनांच्या मदतीने आगीवर त्वरित नियंत्रण मिळवून पुढील दुर्घटना टाळण्यात अग्निशमन दल यशस्वी ठरले. तरी यामध्ये कंपनीतील कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. ही आग नियंत्रणात येत असतानाच मानकीवली येथील मानकीवली रेडसन इंटरप्रायजेस या कंपनीत फरनान्स ऑइल टॅंकला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यामुळे जवळच्या इतर कंपन्यांमध्येही आग पसरण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने आग नियंत्रणात येणे गरजेचे होते. त्याचबरोबर अधिकची कुमक म्हणून अंबरनाथ नगर परिषद व आनंदनगर एमआयडीसी अग्निशमन दलासही पाचारण आगीवर नियंत्रण मिळवले.
अन्य महत्वाच्या बातम्या...