उल्हासनगर - आमदार ज्योती कलानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. मात्र या निवडीला नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदाचा निर्णय बदलला नाहीतर आम्हाला दुसरा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा गटनेते भरत गंगोत्री यांनी दिल्याने पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे.उल्हासनगर पालिका निवडणुकीच्यावेळी ओमी टीमच्या नावाखाली ओमी यांनी राष्ट्रवादीतील झाडून नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकारी स्वत: सोबत घेऊन गेले. तसेच भाजपासोबत महाआघाडी करून त्यांना नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरविले. त्यावेळी पक्षाचे आमदार व शहरजिल्हाध्यक्ष म्हणून ज्योती कलानी यांची भूमिका काय होती? असा प्रश्न गंगोत्री यांनी थेट पक्षश्रेष्ठींना केला. महापालिकेत चार नगरसेवक निवडून आणून पक्ष शहरात जिवंत ठेवला. महापालिका पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवारा विरोधात भाजपा व ओमी टीमचा उमेदवार रिंगणात होता. तसेच कलानी यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराऐवजी विरोधी पक्षाला साथ दिली. असे असतानाही पक्षाच्या सुमन सचदेव यांचा विजय झाल्याचे गंगोत्री यांनी सांगितले.राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते निष्ठेने काम करीत आहेत. अशावेळी पक्षश्रेष्ठीने पक्षविरोधी काम करणाºया कलानी यांची गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने शहरजिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली. अशा अध्यक्षाला आमचा विरोध असून पक्षश्रेष्ठींनी अध्यक्ष निवडीचा निर्णय त्वरित घ्यावा. नाहीतर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल. असा इशाराही गंगोत्री यांनी दिला. यावेळी पक्ष कार्यालयात नगरसेविका सुमन सचदेव, सुनीता बगाडे आदी उपस्थित होते.पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविणारआमदार ज्योती कलानी यांची शहरजिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, गणेश नाईक व प्रदेशाध्यक्षांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून शहरात पक्ष वाढविणार आहे, असे सांगितले.जिल्हाध्यक्षाच्या निवडीवरून पक्षातील वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षाचे प्रामाणिक कार्य करणाºया कार्यकर्ता, पदाधिकाºयास डावलून पुन्हा कलानी यांना संधी दिल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. यातून भविष्यात राष्ट्रवादी पक्षाला शहरात खिंडार पडू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर, कलानींच्या निवडीने वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 3:14 AM