सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिकेने कोविड रुग्णांसाठी दरमहा २४ लाख खर्चून भाड्याने घेतलेले साई प्लातिनियम रुग्णलाय रुग्णा विना पडून आहे. तर दुसरीकडे शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाचे रूपांतर कोरोना बाधित महिला व मुलांसाठी कोविड रुग्णालयात केल्याने गर्भवती महिलांची परवड होत असल्याचा आरोप सर्व स्तरातून होत आहे.
उल्हासनगर महापालिकेने कोरोना महामारीच्या काळात कोट्यवधीं रुपये खर्चून स्वतःचे रिजेन्सी अंटेलिया येथे कोविड रुग्णलाय उभारले. मात्र गेल्या एका वर्षांपासून रुग्णलाय उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी शांतीनगर येथे दरमहा २४ लाख रुपये खर्चून साई प्लॅटिनियंम नावाचे खाजगी रुग्णलाय भाडेतत्त्वावर घेतले. २४ लाख दरमहा भाडेने घेतलेल्या साई प्लॅटिनियम रुग्णालयात सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण उपचार घेत नाही. शहरातील एकून ३२ कोरोना रुग्णा पैकी ३१ रुग्ण होम आयसोलेशन मध्ये तर एका रुग्णावर शहरा बाहेरील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान महापालिकेने कोरोना बाधित महिला व मुलांसाठी कॅम्प नं-४ येथील शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. मात्र रूग्णालयात एकाही कोरोना रुग्णावर उपचार सुरू नाही. अशी माहिती महापालिका वैधकीय अधिकारी दीपक पगारे यांनी दिली. कोविडच्या नावाखाली शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालयात बंद ठेवल्याने, गर्भवती महिलांची परवड होत आहे. त्यांना मध्यवर्ती अथवा कळवा येथील रुग्णालयात हलविले जात आहे. या दरम्यान गर्भवती महिला व तीच्या मुलाच्या जीवावर प्रसंग ओढू शकतो. असा महिलांचा आरोप आहे. कोविड रुग्णा विना पडून असलेले शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालय पुन्हा गर्भवती महिलांसाठी सुरू करण्याची मागणी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यासह महिलाकडून होत आहे.
साई प्लॅटिनियम रुग्णालयात बंद करण्याची मागणी
महापालिकेचे स्वतःचे रिजेन्सी अंटेलिया येथील २०० बेडचे कोविड रुग्णलाय उदघाटना अभावी पडून आहे. तर दुसरीकडे दरमहा २४ लाख रुपये भाड्याने घेतलेल्या साई प्लॅटिनियंम रुग्णालय रुग्णा अभावी धूळखात पडून आहे. महापालिकेने स्वतःचे रुग्णलाय सुरू करून, भाड्याने घेतलेले साई प्लॅटिनियम रुग्णालय बंद करून, दरमहा २४ लाख रुपये वाचवा. या मागणीने शहरात जोर पकडला आहे.