जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी एकाच दिवसात राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह १० पोलिसांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत २३ अधिकाºयांसह २३४ पोलीस बाधित झाले असून यामध्ये केंद्रीय शीघ्र कृती दलाच्या एका अधिकाºयाचाही समावेश आहे. दरम्यान, १६ अधिकारी आणि १३३ कर्मचारी अशा १४९ पोलिसांनी कोरोनावर मात केल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या क्षेत्रामध्ये लॉकडाऊनचे नियम बºयाचअंशी शिथिल केले आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये पोलिसांची कुमक तैनात केलेली आहे. हा बंदोबस्त सुरू असतानाच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ९ जून रोजी एकाच दिवशी राज्य राखीव पोलीस दलातील तीन, पोलीस मुख्यालयातील दोन, नारपोली आणि शांतीनगर पोलीस ठाण्याचे प्रत्येकी दोन आणि गुन्हे अन्वेषण विभागातील एक अशा १० पोलिसांना लागण झाली. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले आहे. आतापर्यंत २३ अधिकारी आणि २११ कर्मचारी अशा २३४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये केंद्रीय शीघ्र कृती दलाच्या उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. यामध्ये १६ अधिकारी आणि १३३ कर्मचारी अशा १४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली. सात अधिकारी आणि ७६ कर्मचारी असे ८३ पोलीस सध्या उपचार घेत आहेत.उपनिरीक्षकाचे जल्लोषात स्वागतवागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाने ८ जून रोजी कोरोनावर मात केली. ते पुन्हा पोलीस ठाण्यात रुजू झाले. त्यावेळी सर्व पोलिसांनी पुष्पवृष्टी आणि टाळ्याच्या कडकडाटामध्ये त्यांचे स्वागत केले. बुधवारीही वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील अन्य एका कर्मचाºयाने कोरोनावर मात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.