शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कोरोनामुळे २० सार्वजनिक मंडळांचा गणोशोत्सव रद्द; पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 4:08 PM

९० मंडळांनी बसविला दीड दिवसाचा गणपती

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झालेला नाही. कोरोनाचे संकट पाहता महापालिका हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाना पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार २० सार्वजनिक मंडळांनी गणेश उत्सव रद्द केला आहे. तर ९० मंडळांनी दहा दिवसांऐवजी दीड दिवसाचा गणपती बसविला आहेत. कोरोना काळात मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद हा खरोखरच उल्लेखीन आणि सामाजिक भान जपणारा आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवलीचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

महापालिका हद्दीत आठ पोलिस स्थानके आहे. या आठ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत २६५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपतीची स्थापना करता. त्याठिकाणी सजावट देखावे उभारले जातात. यंदा गणेश आगमन व विसजर्नाची मिरवणूक काढण्या पोलिसांनी बंदी घातली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी हा नियम केला आहे. आठही पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली असली तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे सोसल डिस्टसिंग पाळून कोरोनाला दूर ठेवणो गरजे आहे. त्यासाठी गणोश मंडळांना पोलिसांनी आवाहन केले होते. त्या आवाहनाला मंडळांनी प्रतिसाद दिला आहे.

२० मंडळांनी उत्सव रद्द केला आहे. तर ९० मंडळांनी दीड दिवसाचे पूजन लहान मूर्तीची स्थापना करुन केले आहे. उर्वरीत मंडळांनीही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करुन सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याची हमी पोलिस प्रशासनाला दिली आहे.यातून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. अनेक मंडळानी कोरोना जनजागृतीपर देखावे उभारले आहेत. हा गणेश उत्सव आरोग्यासाठी प्रबोधनात्मक ठरावा अशी आपेक्षा उपायुक्त पानसरे यांनी व्यक्त केली आहे.

येत्या 30 ऑगस्ट रोजी मुहर्रम ताजिया साजरा केला जाणार आहे. मात्र मुस्लिम बांधवांनाही पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार २५ ठिकाणचा मुहर्रम ताजिया रद्द करण्यात येणार आहे, अशी हमी मुस्लिम बांधवांनी पोलिसांना दिली आहे कारण गणेश उत्सव व मुहर्रम ताजिया हे देखील एकाच वेळी आले आहेत. गणेश उत्सवाकरीता ६५० पोलिस कर्मचारी, १०० पोलिस अधिकारी आणि ३ राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत असे उपायुक्त पानसरे यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेशोत्सव