शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

कोरोनामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन डे उत्साहात, पण व्हर्च्युअल करू साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:43 AM

तरुणाईमध्ये कमालीची जागरुकता

ठाणे : येत्या रविवारी व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे. दरवर्षी वाट पाहत असलेल्या या दिवसावर यंदा मात्र कोरोनाचे संकट आहे. पुढचे अनेक व्हॅलेंटाइन डे साजरे करायचे असतील तर यंदा घरीच, सुरक्षित राहा. प्रत्यक्ष भेटण्याचा अट्टहास न करता ऑनलाइनदेखील हा दिवस साजरा करता येऊ शकतो, अशी मते तरुणाईमधून व्यक्त होत आहेत. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा व्हॅलेंटाइन वीक म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा आठवडा ‘’रोज डे’’ला सुरू होऊन ‘’व्हॅलेंटाइन डे’’ला संपतो. सात दिवसांत येणारे विविध डेज ही तरुणाई मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसत असते. महाविद्यालयात वेगळाच उत्साह या आठवड्यात तरुणाईमध्ये पाहायला मिळत असतो. तसेच प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू देत असतात. या आठवड्यात आपल्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत मॉल्स, हॉटेलमध्ये हा दिवस साजरा करायला तरुण मंडळींची गर्दी असते. दुकाने, मॉल, रेस्टॉरंट या दिवशी हार्ट शेपने सजवलेली पाहायला मिळतात. अनेक ऑफर्सही यावेळी असतात. कोरोनामुळे यंदा मात्र तरुणाईच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाता कुटुंबासोबत एक वर्ष हा दिवस साजरा करायला हरकत नाही, तर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून हा दिवस साजरा करावा, अशी मते तरुण मंडळी व्यक्त करीत आहे.व्हॅलेंटाइन डे’ सार्वजनिक ठिकाणी भेटूनच साजरा केला पाहिजे, हा अट्टहास करणं, मुख्यत्वे कोरोनाकाळात योग्य नाही. आपल्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला एखादी भेटवस्तू ऑनलाइन पाठवणं, व्हिडीओ कॉलवरून संवाद साधणं आणि आपल्या भावना व्यक्त करणं, अशा नव्या पद्धतीने आपण व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकतो. या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या कुटुंबीयांसोबत हा दिवस साजरा करणे, हे आपल्या कुटुंबीयांना, या दिवशी, एक वेगळंच सरप्राइझ असेल !- कौस्तुभ बांबरकरशासनाने आखलेल्या नियमांचं पालन करून जर प्रत्यक्षात भेटणं आणि एन्जॉय करणं शक्य असेल तर का करू नये. तसंही आपण आपले इतर सण पण साजरे केलेच आणि जर भेटणं शक्य नसेल तर या लॉकडाऊनमध्ये आपण इतर ऑनलाइन पर्याय पण शिकलोच आहोत. ऑनलाइन मीटिंगसारखं ऑनलाइन डेटसुद्धा होऊच शकते. तसं तर प्रेम व्यक्त करायला एका विशिष्ट दिवसाची गरज नसते.  - प्रणीत गिरकरकोरोनाचे सावट अजून गेले नसताना व्हॅलेंटाइन डे  साजरा करावा की नाही?  प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सकारात्मक आणि नकारात्मक. प्रेम हे एकाच दिवशी साजरेेे का करायचे? माझ्या मतानुसार, हा एकच नाही? तर असे अनेक व्हॅलेंटाइन डे जर आपल्या पार्टनरसोबत साजरे करायचे? असतील तर... घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आनंद पसरवा. - प्राजक्ता सावंतसध्याची परिस्थिती बघता कुठलाही सण, इव्हेंट साजरे करण्याची आवश्यकता नाही आणि त्यातल्या त्यात व्हॅलेंटाइन डे अजिबातच नाही. हा सण आपल्या जीवापेक्षा किंवा इतरांना असुरक्षित ठेवून साजरा करणे इतका महत्त्वाचा आहे का? यावर्षी कुठेही गर्दी करून सण साजरे करू नये, हीच इच्छा.  - दीपक तपासेसध्याची स्थिती पाहता व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात येऊ नये. कोरोनाचा पूर्ण अंत होत नाही, तोपर्यंत आपण विनाकारण गर्दी टाळली पाहिजे... नाहीतर २०२१ मध्ये ही २०२० सारखी लॉकडाऊनची परिस्थिती येऊ शकते.- नितीन यादव

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे