शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

कोरोनाच्या संकटात सत्ताधारी भाजपाला 150 कोटी रुपयांचे ठेके देण्याची लगीनघाई; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 1:58 PM

16 व 20 मार्च आणि 26 जून रोजी सत्ताधारी भाजपाने कोरोना संसर्ग काळात देखील स्थायी समितीच्या तीन बैठका घेतल्या

मीरारोड - कोरोना संसर्गा मुळे सर्व सामान्य नागरिक त्रासले असताना मीरा भाईंदर महापालिकेत मात्र सत्ताधारी भाजपाने केवळ 3 स्थायी समिती बैठकीत सुमारे 150 कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी दिली आहे. कोविड केअर, अलगीकरण केंद्र व जोशी रुग्णलयातील नागरिकांना चांगले जेवण, सुविधा देऊ न शकणाऱ्या भाजपाला कोट्यवधी रुपयांच्या निविदा मंजूर करण्याची लगीनघाई कोणाचे खिसे भरण्यासाठी ? असा सवाल ज्येष्ठ नगरसेवक अनिल सावंत यांनी केला आहे . 

सावंत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व स्थायी समिती सदस्य आहेत . त्यांनी सांगितले की, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच भीमसेन जोशी रुग्णालय व मुख्यालयाचा दौरा केला . त्यावेळी फडणवीस यांनी महापालिकांना आणखी मदत सरकार ने करावी असे म्हटले होते . परंतु पालिकेतील सत्ताधारी भाजपाला मात्र जनतेची आणि पालिकेच्या आर्थिक स्थितीशी काहीच सोयरसुतक नाही . 

16 व 20 मार्च आणि 26 जून रोजी सत्ताधारी भाजपाने कोरोना संसर्ग काळात देखील स्थायी समितीच्या तीन बैठका घेतल्या . या तिन्ही बैठकीत कॉर्न संसर्गाचा आढावा , त्यावर उपाययोजना आणि नागरिकांना आवश्यक सुविधा देऊन दिला देण्याचा एकही विषय भाजपाने घेतला नाही . परंतु सुमारे 150 कोटी पेक्षा जास्त खर्चाचे अन्य कामांचे ठेके देण्याच्या निविदा मात्र मंजुरीस आणल्या आणि बहुमत असल्याने मंजूर केल्या . 

 

सदर कामे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आताच मंजुरी देणे आवश्यक नव्हते . कारण आताच कामे सुरु होतील आणि झालीच तरी पालिके कडे पैसे आहेत का ? ती नंतर देखील देता आली. आज शहरामध्ये कोरोना रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांची स्थिती अत्यंत भयावह आहे.आरोग्य कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये प्रामाणिक पणे काम करत आहेत. मनपाचे भाईंदर पश्चिम येथील एकमेव  जोशी कोविड रुग्णालय, कोविड केअर व अलगीकरण कक्षातुन रुग्ण आणि नागरिकांच्या उपचार , जेवण , स्वच्छता, गैरसोयी आदींच्या असंख्य तक्रारी आहेत.  त्या दूर करण्यासाठी भाजपाची इच्छा नाही आणि त्यावर पैसे खर्च करायची देखील दानत दिसत नाही . 

कोरोनाचा कहर वाढतोय पण त्यावर ठोस उपाय केले जात नाहीत . यांचे नेते महापौर  दालनात येऊन नियमबाह्य बैठका घेतात त्या या ठेके आणि निविदा मंजुरी साठीच्या असतात कि जनतेच्या हिताच्या ? हेच या सुमारे 150 कोटी रुपयांच्या निविदा मंजुरी वरून  लोकांना कळून चुकले आहे असे सावंत म्हणाले .  या बाबत भाजपाचे उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्य हसमुख गेहलोत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही . 

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक