लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : कोरोनामुळे आईवडील हे दोन्ही किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्यांमध्ये तब्बल सात हजार ४४५ जणांचा जिल्ह्यात समावेश आहे. या परिवारांचा ठिकठिकाणी जाऊन जिल्हा प्रशासन शोध घेत आहे. आतापर्यंत १२ बालकांचा शोध लागलेला असून चार हजार ८३९ परिवारांचा शोध सुरू आहे. तर दोन हजार १९ मृतांचे पत्तेच यंत्रणेला सापडलेले नाही. कदाचित ते परराज्यातील असण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणातून आढळणाऱ्या सर्व बालकांना शासनाकडून सर्व त्या सोयीसुविधा देऊन शासनाच्या सवलती व योजनांचा लाभ करून दिला जाणार आहे.
यासाठी जिल्ह्यात या कुटुंबाचे सर्वेक्षण करणे व या बालकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधांसह या मुलांना कायदेशीर सेवा पुरवणे, त्यांना मदत करणे, त्यांचे समुपदेशन व पुनर्वसन करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा कृती दल गठित केले आहे. अनाथ बालकांची काळजी आणि संरक्षण अंतर्गत कोविडमुळे आईवडील हे दोन्ही किंवा एका पालकांचा मृत्यू झाला असला तरीही या मुलांमुलींकरिता शासन निर्णयानुसार व मार्गदर्शन सूचनेनुसार टास्क फोर्सची जिल्ह्यात स्थापना केली.
जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख १२ हजार ५६७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात नऊ हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन्ही आईवडील किंवा यापैकी एकाचा मृत्यू झालेल्या तब्बल सात हजार ४४५ बालकांचा समावेश आहे.
......