ठाणे - कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा फटका अनेक उद्योगधंद्यांना बसत आहे. या काळात उत्पन्नाची साधने बंद असल्याने अनेक कुटुंबासमोर गंभीर संकट निर्माण झालेले आहे. अशा गरीब, गरजू कुटुंबांना.सेंट्रम फाउंडेशन व सेंट्रम मायक्रोक्रेडिट टीम मदतीसाठी पुढे आली आहे.
या संस्थेने ठाण्यातील किसननगर, कासारवडवली परिसरातील १५० कुटुंबांना मदत केली आहे. या कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात समाजातील प्रभावित घटकांना मदत देण्यासाठी आम्ही आपले प्रयत्न करीत आहोत, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.