लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन व त्यांचे पती भरत हे कोरोना पॉझिटिव्ह असून घरी त्यांनी केक भरवून वाढदिवस साजरा केल्याने भाजपातील माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांनी त्यांच्यावर टीका चालवली आहे.
गीता जैन , त्यांचे पती, अन्य दोन नातलग तसेच बंगल्यातील तीन कर्मचारी असे 7 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. जैन कुटुंबीयांचा स्वतंत्र बंगला असून वेगवेगळ्या खोल्या असल्याने सर्वाना घरातच अलगीकरण करून ठेवले आहे. काल रविवार 5 जुलै रोजी गीता यांचा वाढदिवस होता. गीता यांचे पती भरत सह घरातच केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा करतानाचे फोटो समाज माध्यमावर त्यांच्या पतीनेच शेअर केले होते.
आता त्यावरून मीरा भाईंदर भाजपातील माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांनी गीता यांच्यावर टीका सुरू केली आहे. मेहता समर्थक भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण शहरात वाढत असताना आमदार गीता जैन यांनी असा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. सामान्य रुग्णांना पालिका बळजबरीने कोविड केअर वा अलगीकरण कक्षात नेऊन ठेवते मग आमदारना वेगळा न्याय का ? आम्ही याची तक्रार अतिरिक्त आयुक्त यांच्या कडे केल्याचे पाटील म्हणाले.
माजी महापौर डिंपल मेहता म्हणाल्या की, कोरोनाच्या या संकट समयी त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे फोटो असे सोशल मीडियावर टाकण्याची गरज नव्हती. शिवाय ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी नियम पाळले पाहिजेत.
आमदार गीता जैन यांनी सांगितले की, मी व पती कोरोना पॉझिटिव्ह असून कोरेनटाईन आहोत. पण वाढदिवसाच्या असंख्य नागरिकांच्या शुभेच्छा येत होत्या तर काहींनी केक पाठवले म्हणून तेवढ्या केक कापण्या पुरते आम्ही दोघे पॉझिटिव्ह असल्याने आलो. विरोधक आरोप करण्यासाठी कारण शोधत असून खोटेनाटे लिहून मॅसेज टाकत आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ सुरेश येवले यांनी मात्र मेहता समर्थक सुडद्वेष बुद्धीने पराचा कावळा करत आहेत. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले तेव्हा याच नरेंद्र मेहता व समर्थकांनी डीजेच्या तालावर जाहीर वाढदिवस पार्टी केली होती. कोरोना काळात महापौर दालनात टपोरी भाषा प्रवृत्तीचा वाढदिवस केला गेला. आमदार गीता यांनी घरात पती सह केक कापला तर गैर काय? असा सवाल डॉ येवले यांनी केला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ; शरद पवारांच्या मातोश्रीभेटीनंतर राऊतांची मोठी घोषणा
ठाकरे सरकारला दणका! अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र
गुड न्यूज! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट
टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका
ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका
लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार