सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ सुभाष टेकडी येथील शासकीय बालसुधारगृहातील ३३ पैकी १६ मुलांना कोरोना झाल्याचे उघड होऊन त्यांच्यावर महापालिकेच्या कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली. मुलांच्या तब्येती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी पगारे म्हणाले.
उल्हासनगरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घट होत असतांना कॅम्प नं-४ सुभाष टेकडी येथील शासकीय बालसुधारगृहातील काही मुलांना ताप, खोकला, सर्दी यांचे लक्षणे आढळून आली. महापालिका आरोग्य पथकाने ३३ मुलांची कोरोना चाचणी केली असता, ३३ पैकी १६ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे बुधवारी उघड झाले. संसर्ग झालेल्या मुलांना कॅम्प नं-५ येथील महापालिका कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले. तर इतर मुलांना बालगृहात राहणार असून त्यांच्यावर डॉक्टरांचा वॉच राहणार आहे. कोरोनाग्रस्त झालेल्या मुलांची तब्येत धोक्या बाहेर असून त्यांच्यावर उपचार करून लवकरच सोडून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक पगारे यांनी दिली. तसेच शहरातील कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे ते म्हणाले.
शहरात एकून १ हजार ४९९ पॉझिटिव्ह रुग्ण असून बहुतांश जणांना सौम्य लक्षणे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी पगारे यांनी दिली. गुरवारी एकून ९८ कोरोना रुग्ण आढळून आले असून २४६ जणांना घरी सोडण्यात आले. महापालिका कोविड रुग्णलाय व कोरोना सेंटर मध्ये एकून ९१ जण रुग्ण उपचार घेत असून शहारा बाहेरील रुग्णालयात १०२ रुग्ण उपचार घेत आहेत. इतर रुग्ण शहरातील खाजगी रुग्णालय व घरी विलगिकरणात उपचार घेत असल्याची माहिती पगारे यांनी दिली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले असून रुग्ण बरे झाल्याचे प्रमाण ९१.५६ टक्के असल्याचे पगारे म्हणाले. वातावरण असेच राहिल्यास शहर काही दिवसात कोरोना मुक्त होईल. अशी आशाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.