ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णायातील एका ५५ वर्षीय वैद्यकीय महिला अधिकारी हीलाच कोरोनाची लागण झाली असल्याची बाब समोर आली आहे. या तिच्या संपर्कात आलेल्या ३ ते ४ इतर वैद्यकीय अधिकारी तसेच कोरोना पॉझटिव्ह निघालेल्या या अधिकाऱ्याच्या २ मुलींची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून त्यांना क्वॉरन्टाइन करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी याच हॉस्पिटलमधील एका वैद्यकीय महिला कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी लढा देणाºया अधिकारी तसेच नर्सना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचे या हॉस्पिटलमधील स्टाफचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात लोकमान्य नगर परिसरातील एका रु ग्णाच्या संपर्कात येऊन ही महिला वैद्यकीय कर्मचारी हीला कोरोना लागण झाली होती. त्यानंतर हॉस्पिटलमधील जवळपास ६० जणांना क्वॉरन्टाइन करण्यात आले होते. तर हॉस्पिटलमधील प्रसूती विभाग देखील बंद कारणात आला आहे. आता एका ५५ वर्षीय वैद्यकीय अधिकारी महिलेला देखील कोरोनाची लागण झाली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातारण आहे. कोरोना पॉझटिव्ह रु ग्ण या हॉस्पिटलमध्ये युनिट हेड असून त्यांच्या संपर्कात त्यांच्या दोन मुली आणि इतर ३ ते ४ वैद्यकीय अधिकारी आहेत. या सर्वाना टेस्ट करून क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मात्र हॉस्पिटलमध्ये वावरत असताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीपीई किट्स उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे आरोप हॉस्पिटलमधील वैद्यकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. मागणी करूनही अद्याप पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर हॉस्पिटलमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून वैद्यकीय अधिकारी आणि महिला कर्मचारी यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय आयसोलेशन वॉर्डमध्ये जाताना पीपीई किट्स दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालिकेच्या कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 5:53 PM