लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातून कोरोना कमी होऊ लागला आहे. अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत भागातून कोरोना हद्दपार होत आहे. शहापूर तालुक्यात ७ जूनपासून एकही रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायती ७३ आहेत. मुरबाडमधील ५ आणि शहापूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नसल्याने या ग्रामपंचायतींनी कोरोनाचा वेशीवर अटकाव केल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाची दुसरी लाटही जिल्ह्यातून ओसरू लागली आहे. दुसऱ्या लाटेचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागालाही बसला. मृत्यूचे प्रमाणही या भागांमध्ये अधिक होते. आता जिल्ह्यातील पाचही तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करु लागले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील २८ पैकी ७ ग्रामपंचायतींत मागील २८ दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही. मागील ७ जूनपासून १२ ग्रामपंचायतीत एकही नवा रुग्ण नाही, तर दोन्ही लाटांमध्ये २ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. भिवंडीमधील १२१ पैकी ४४ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण नाही, तर ७ जूनपासून ५६ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण नाही. दोन्ही लाटांमध्ये ६ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. कल्याण तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण नाही, तर ७ जूनपासून १९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण नाही. दोन्ही लाटांमध्ये ३ ग्रामपंचायतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. मुरबाड तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतींपैकी ६२ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण आढळला नाही, तर मागील ७ जूनपासून ९९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण आढळला नाही. दोन्ही लाटांमध्ये ४४ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. पाच तालुक्यांत दोन्ही लाटांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही, तर या तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. कल्याण तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही. ७ जूनपासून १९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण आढळला नाही. दोन्ही लाटांमध्ये ३ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. मुरबाड तालुक्यातील १२६ पैकी ६२ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नसून, ७ जूनपासून ९९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण नाही. दोन्ही लाटांमध्ये ४४ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. पाच ग्रामपंचायतीत दोन्ही लाटांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. या तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण मिळालेला नाही. ७ जूनपासून ७३ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण आढळला नाही. दोन्ही लाटांमध्ये येथील १५ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. एकूण पाच तालुक्यांतील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १५७ ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. ७ जूनपासून २५९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण नाही. दोन्ही लाटांमध्ये सहा ग्रामपंचायतींत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पाचपेक्षा कमी रुग्ण हे ७० ग्रामपंचायतींत आढळून आले आहेत. १७२ ग्रामपंचायतींत काही कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
आतापर्यंत झालेल्या चाचण्या - ७४८५९
बाधित होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - १०.५०
रुग्ण बरे होण्याचे होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - ९५ टक्के
एकूण रुग्ण - ३८२९५
बरे झालेले रुग्ण -३६५६८
उपचार सुरू असलेले रुग्ण - ६००
मृत्यू - ११२७
तालुका - ॲक्टिव्ह रुग्ण
अंबरनाथ -६५
कल्याण - १९५
भिवंडी - २३५
शहापूर - ७५
मुरबाड - ३०
अनलॉकनंतर कोणत्या तालुक्यात रुग्ण वाढले आणि कुठे कमी झाले
अनलॉकनंतर ठाणे जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत नव्याने रुग्ण वाढले नाही. सध्या तरी या पाचही तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात दिसत आहे.
कोरोना संपलेला नाही, मात्र नियंत्रणात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेतली जात असून, तालुकानिहाय टेस्टिंगचे टारगेट दिले जात आहे. ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याठिकाणी घरोघरी जाऊन अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
(डॉ. मनीष रेंगे - जिल्हा आरोग्य अधिकारी )