मीरारोड - मीरा भाईंदरच्या महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या घरात व पालिकेतील दालनात कोरोनाचा शिरकाव झाला आहे . महापौरांच्या पालिका दालनात होणारी गर्दीचा विषय होऊन देखील त्या कडे केले जाणारे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे .
महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी आपल्या घरात स्वतःला विलगीकरण करुन घेतले आहे. त्यांच्या पतींना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. महापौरांचा कोरोना चाचणी अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. याआधी महापौरांच्या पालिका दालनातील संगणक चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती . महापौरांच्या पालिका दालनात अनेकजण गर्दी करून असतात . त्यांच्या दालनात बसून मास्क देखील काहीजण घालत नाहीत . तर पालिकेच्या लेखापरीक्षण विभागात व लेखा विभागातील दोन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना मिळून चौघांना कोरोनाची लागण झालेली आहे.