शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:50 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ४४५ रुग्ण आढळून आले तर मागील २४ तासांत ११ रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ४४५ रुग्ण आढळून आले तर मागील २४ तासांत ११ रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३४ हजार ८९७ रुग्णांसह मृतांची संख्या १० हजार ७५५ नोंदली गेली आहे.

ठाणे मनपा हद्दीत ९७ रुग्ण आढळून आले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतची रुग्णसंख्या एक लाख ३३ हजार ८२३ झाली आहे. तर एकूण दोन हजार २३ जण दगावले आहेत. केडीएमसी हद्दीत ११६ रुग्ण नोंदवले गेले असून, एकूण रुग्णसंख्या एक लाख ३६ हजार ८३५ झाली. दिवसभरात एकाचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत दोन हजार ६०१ मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरला सहा रुग्णांच्या वाढीसह दोन मृत्यू झाले. आता येथील रुग्णसंख्या २० हजार ८२४ झाली असून ५१३ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीत दोन रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झालेला नाही. येथील एकूण रुग्ण १० हजार ६३० झाले असून, मृत्यू ४५९ नोंदवले गेले. मीरा-भाईंदरला २८ रुग्णांची वाढ होऊन मृतांची नोंद नाही. आता येथील रुग्णसंख्या ५० हजार ८२८ झाली असून एक हजार ३४२ मृतांची नोंद झाली आहे.

अंबरनाथला १८ रुग्णांची वाढ झाली असून, एकही मृत्यू झालेला नाही. येथील रुग्णसंख्या आता १९ हजार ७९३ झाली असून ५१७ मृतांची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये २८ रुग्णांची भर पडली आहे. आज मात्र एकही मृत्यू नाही. आता येथील २१ हजार २११ रुग्णांसह ३४७ मृतांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये ६७ रुग्ण सापडले असून तीन जण दगावले. या परिसरात आजपर्यंत ३९ हजार ६०२ रुग्णांची वाढ होऊन एक हजार १८८ मृतांची नोंद झाली आहे.

-------------------