लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णांची संख्या ४४२ने वाढली असून, ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३४ हजार ४५३ बाधित रुग्णांची, तर १० हजार ७४४ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
ठामपा हद्दीत दिवसभरात १०१ रुग्ण आढळले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या एक लाख ३३ हजार ७३१ झाली आहे, तर मृतांची संख्या दोन हजार २० नोंदवली गेली. केडीएमसी हद्दीत ७४ बाधित व दोन मृत्यू झाले आहेत. या मनपा हद्दीत एकूण एक लाख ३६ हजार ७१९ बाधितांसह दोन हजार ६०० मृतांची नोंद झाली.
उल्हासनगरमध्ये ११ बाधित व तीन मृत्यू नोंदवले गेले. यासह शहरात एकूण २० हजार ८१८ बाधित, तर ५११ मृतांची नोंद झाली. भिवंडीत दोन बाधित सापडले. तर, एकाचाही मृत्यू झालेला नाही. यामुळे या शहरातील १० हजार ६२८ बाधितांसह ४५९ मृत्यू नोंद कायम आहेत. मीरा - भाईंदरला ३५ बाधित व एकाचा मृत्यू झाला. या शहरातील ५० हजार ८०० बाधित व एक हजार ३४२ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंबरनाथमध्ये ११ बाधित व एकही मृत्यू नाही. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १९ हजार ७७५ व मृतांची संख्या ५१७ नोंदली आहे. बदलापूरमध्ये २० बाधित सापडले असून, आजवरचे बाधित २१ हजार १८३, तर मृत्यू ३४७ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ४६ बाधित सापडले. पण एकही मृत्यू नाही. यामुळे या ग्रामीण क्षेत्रात आजपर्यंत ३९ हजार ५३५ बाधितांची व एक हजार १८५ मृतांची नोंद झाली आहे.
-----------