नवी मुंबई : शहरात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू कोपरखैरणे, तुर्भे व कामोठे परिसरात झाले आहेत. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोनाचे तब्बल ३ हजार ८६१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचा संसर्ग पसरण्याचे टाळण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ३ हजार ८६१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये परिमंडळ एकमध्ये २ हजार ७३३ तर परिमंडळ दोनमध्ये १००३ जणांचा समावेश आहे. तर आयुक्तालय कार्यक्षेत्रात १२८ जणांचे निधन झाले आहे. त्यापैकी परिमंडळ एकमध्ये ८८ जणांचे तर परिमंडळ दोनमध्ये ४० जणांचे निधन झाले आहे. परिमंडळ एकमध्ये शहरी भाग व दाट लोकसंख्या आहे. त्यामुळे संसर्ग अधिक पसरला आहे.बैठ्या चाळी व एपीएमसी मार्केटशी संबंधित व्यक्तींचे तेथे वास्तव्य आहे. संपूर्ण आयुक्तालय कार्यक्षेत्रात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत झाले आहेत.पोलीस ठाणेनिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यापरिमंडळ एकवाशी २५५एपीएमसी २७९कोपरखैरणे ५२७रबाळे ४६८रबाळे एमआयडीसी १८५सानपाडा १५१तुर्भे २४७नेरूळ ४२१एनआरआय १५७सीबीडी ४३परिमंडळ दोनपनवेल सिटी ९६पनवेल तालुका ३१कळंबोली ११२खारघर १४९कामोठे २४९तळोजा १३खांदेश्वर १७७उरण १५७न्हावा-शेवा १६मोरा ३पोलीस ठाणेनिहायमृत्यूंची संख्यापरिमंडळ एकवाशी ७एपीएमसी ११कोपरखैरणे १६रबाळे ९रबाळे एमआयडीसी ५सानपाडा ४तुर्भे १४नेरूळ १४सीबीडी ०एनआरआय १०परिमंडळ दोनपनवेल सिटी ३पनवेल तालुका ५कळंबोली ६खारघर ५कामोठे १३तळोजा २खांदेश्वर ५उरण १न्हावा-शेवा 00मोरा 00च्कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत अधिक रूग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अशा ठिकाणी पालिकेकडून विशेष शिबिरे राबविली जात आहेत, तर पोलिसांकडूनही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर अंकुश लावला जात आहे.