कल्याण : कल्याणमध्ये कोरोनामुळे सोमवारी बैलबाजार परिसरातील ६५ वर्षीय पुरुष आणि टिटवाळा परिसरातील गाळेगावातील ७० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे केडीएमसी हद्दीतील एकूण मृतांची संख्या ३१ झाली आहे. दुसरीकडे ६२ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या एक हजार ८६ झाली आहे.नवीन ६२ रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १२, पश्चिमेतील २५, डोंबिवली पूर्वेतील १०, पश्चिमेतील १३ आणि टिटवाळ्यातील दोन दोघे आहेत.त्यापैकी ३८ पुरुष आणि २४ महिला आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३८३ असून, ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मीरा-भाईंदरमध्ये पाच जणांचा बळीच्मीरा-भार्इंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून या शहरांतील एकूण रुग्णसंख्या ७३८ वर गेली आहे. रविवारी एका दिवसात ८९ नवे रुग्ण, तर पाच जणांचा बळी गेल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.च्रविवारी रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार, मृतांची एकूण संख्या २९ झाली आहे. तर दिवसभरात १९ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४२४ झाली आहे. तसेच १९४ जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. शहरात नियमांचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे.उल्हासनगरमध्ये २० नवे रुग्ण, एकाचा मृत्यूउल्हासनगर : उल्हासनगरात कोरोनाचे २० नवे रुग्ण सापडले आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. उल्हासनगर कॅम्प नं. १ मध्ये रमजपो आश्रम व अमृतपर्व परिसरात ३, कॅम्प नं. २ येथील खेमानी रोड ४, रमाबाई आंबेडकरनगर येथे ६, हिरा मॅरेज हॉल १, चोपडा कोर्ट परिसर १, कॅम्प नं. ३ येथील ओटी सेक्शन १, आंबेडकरनगर-३ व आनंदनगर १ असे २० रुग्ण सोमवारी आढळले. आतापर्यंत तर १४६ जण कोरोनामुक्त झाले, तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे दोन वृद्धांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 12:33 AM