शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:24 AM

चार हजार ७७१ रुग्णांनी केली मात : ५१ हजारांची केली चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या चार हजार ४०४ रुग्णांवर गुरुवारपर्यंत उपचार सुरू असून आतापर्यंत चार हजार ७७७ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ५०.३१ टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात नऊ हजार ४८४ रुग्णांची नोंद झाली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर या भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका तसेच ग्रामीण भागात आज अखेरपर्यंत कोरोनाची लक्षणे आढळलेल्या ५१ हजार ४३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३९ हजार ३५० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे आढळून आले. आहे. आतापर्यंत ३०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठाणे शहरात प्रत्यक्ष उपचार घेत असलेले १८०२ रुग्ण असून आतापर्यंत १,५४४ रुग्ण बरे झाले असून १०३ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६१२ रुग्ण असून ५८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत ८८५ रुग्ण असून १,५१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ७८ जणांचे या आजारामुळे निधन झाले. मीरा-भार्इंदरमध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २८५ असून ११४ जण बरे झाले असून ४१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २९६ रुग्ण उपचार घेत असून ११४ जण बरे झाले आहेत. मात्र, १७ जण कोरोनाविरुद्धची लढाई हरले.

भिवंडीमध्ये १०७ रुग्ण उपचार घेत असून ७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथमध्ये १२४ रुग्ण उपचार घेत असून ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, सात जणांचे निधन झाले. बदलापूरमध्ये १२४ रुग्ण असून १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर सात जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीण भागात १६९ रुग्णांवर उपचार सुरू असून २३७ जणांनी कोरोनावर मात केली असून नऊ जणांचे मृत्यू झाले.कल्याण-डोंबिवलीत ४७ नवे रुग्णच्कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गुरुवारी कोरोनाचे नवे ४७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक हजार २७५ झाली आहे. तर, आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांमध्ये पाच लहान मुले, तर २० पुरुष आणि २२ महिला आहेत.च्कल्याण पूर्वेतील २०, पश्चिमेतील सहा, डोंबिवली पूर्वेतील सात, टिटवाळ्यातील पाच जणांनाही लागण झाली आहे. उपचाराअंती घरी गेलेल्यांची संख्या ५९५ आहे. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६४६ आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस