लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये दिवसभरात कोरोनाचे 7 नविन रुग्ण आढळले असून अजून 158 जणांचे कोरोना चाचणी अहवाल यायचे आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 242 इतकी झालेली आहे .
पालिकेने शुक्रवारी रात्री उशिरा दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार दिवसभरात तब्बल 33 नवीन कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
आज शनिवारी सायंकाळी पालिकेने दिलेल्या अहवालात नव्याने दिवसभरात 7 कोरोना रुग्ण आढळले. नवीन आढळलेल्या 7 रुग्णां मध्ये भाईंदरच्या गणेश देवल नगर झोपडपट्टी मध्ये मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्याचा समावेश आहे. या शिवाय भाईंदरच्या राई शिवनेरी, खारीगाव व काशीगावच्या पंच बंगला शेजारी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. मीरारोडच्या शीतल नगर मधील नुपूर पॅलेस मध्ये आणखी 3 रुग्ण सापडले आहेत.
कोरोना लागण झालेले हे परिचारिका, कीटकनाशके फवारणी कर्मचारी, विध्यार्थी, गृहिणी, इस्टेट एजंट, वेल्डिंग काम कामगार आहेत. आता पर्यंत शहरात 7 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेले असून 127 जण कोरोनातून बरे झालेले आहेत.