लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचेननुसार शहरातील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील अपंगासाठी फिरत्या (मोबाईल) लसीकरण सुविधेच्या माध्यमातून घराजवळच लस देण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ११.३० वाजता महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा तसेच इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका भवन येथे या फिरत्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार आहे.ठाणे महापालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. सध्या ६० वर्षे वयोगटातील जेष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षावरील अपंगत्व असलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर जाण्यासाठी कसरत करावी लागते. हा त्रास होऊ नये, यासाठी त्यांना घराजवळच लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे महापालिकेच्या वतीने कोविड-१९ मोबाईल लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे.महापौर म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. शर्मा तसेच उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते आणि अशरफ उर्फ शानू पठाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका भवन येथे सकाळी ११.३० वाजता या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत १०० डोस दिले जाणार आहेत. यामध्ये शहरातील वेगवेगळया ठिकाणी या बसच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार दररोज लस देण्यात येणार असल्याचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या वतीने जेष्ठ नागरिकांसह अपंगासाठी कोरोना प्रतिबंधक फिरते लसीकरण केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 1:09 AM
ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचेननुसार शहरातील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील अपंगासाठी फिरत्या (मोबाईल) लसीकरण सुविधेच्या माध्यमातून घराजवळच लस देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देमहापौर आणि पालिका आयुक्तांच्या हस्ते होणार शुभारंभ