शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कोरोनामुळे गृहिणींचे वाळवणाचे बेत फसले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 2:33 AM

. मात्र आता त्यासाठी लागणाऱ्या काही साहित्याचा बाजारात तुटवडा असल्याने महिलांचे हे बेत सुकण्याआधीच फसत आहेत. त्यामुळे महिलांनी कमी साहित्यात बनणारे ठरावीक वाळवणाचे पदार्थ बनवण्यावर भर दिला आहे.

स्नेहा पावसकर ठाणे : मार्च-एप्रिलचा महिना म्हटला की, घरोघरी गृहिणींची वाळवणाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. यंदा कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे गेल्या महिनाभरापासून गृहिणींसह नोकरदार महिलांनाही हे वाळवणाचे पदार्थ बनवायला चांगली संधी मिळाली आहे. मात्र आता त्यासाठी लागणाऱ्या काही साहित्याचा बाजारात तुटवडा असल्याने महिलांचे हे बेत सुकण्याआधीच फसत आहेत. त्यामुळे महिलांनी कमी साहित्यात बनणारे ठरावीक वाळवणाचे पदार्थ बनवण्यावर भर दिला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमधील सक्तीच्या सुट्यांमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वच जण घरी आहेत. मार्च-एप्रिल-मे या महिन्यात अनेक घरातील गृहिणी पापड, कुरडया, सांडगे असे वाळवणाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त दिसतात. यंदा कोरोनामुळे घरातून बाहेर पडण्यास बंदी असल्याने मार्चमध्ये महिलांनी हे पदार्थ बनवायला प्राधान्य दिले नाही. आता लॉकडाउन वाढल्यानंतर अनेक महिलांनी हे पदार्थ बनवण्याकडे मोर्चा वळवला आहे.एरवी नोकरदार महिलांना नोकरीच्या व्यापामुळे यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र यंदा अजूनही लॉकडाउन संपेपर्यंतचा काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तसेच हे वाळवणाचे पदार्थ शेजारी-मैत्रिणींची मदत घेऊन करावे लागतात. आता मात्र कुटुंबातील सर्वच मंडळी घरी असल्याने अनेक घरी ते पदार्थ बनवायला सुरूवात केलीआहे.बटाटा, तांदूळ, गहू, नाचणी, विविध प्रकारच्या डाळी, रवा, साबुदाणा, पोेहे, तीळ, मसाला, पापडखार असे विविध साहित्य यासाठी आवश्यक असते.मात्र कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये बाजारातील किरकोळ दुकानदारांकडे आधीच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे, तर घाऊक बाजारात या वस्तू घेण्यासाठी लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत. आणि त्यातही काही आवश्यक साहित्य दुकानांतून उपलब्धच नसल्याने नागरिकांचा व विशेषत: वाळवणाचे बेत आखलेल्या गृहिणींचा हिरमोड होत आहे. त्यामुळे हे पदार्थ कधी बनवणार असा सवाल केला आहे.>लाकडाउनमुळे आॅफिसला सुटी असल्याने पापड, चकल्या, वेफर्स, कुरडया असे वाळवणाचे पदार्थ बनवायला पुरेसा वेळ हाती होता. तसेच मदतीला घरातीलच इतर सदस्यही हजर होते. मात्र या पदार्थांसाठी लागणाºया साहित्याचा बाजारातील दुकानांतून तुटवडा असल्याने ते पदार्थ योग्यरितीने बनणार नाहीत. परिणामी एखाददुसरा पदार्थच बनवता येईल. - सुरक्षा दळवी, नोकरदार महिला.