शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

कल्याण-डोंबिवलीत कोरोना लसीकरण केंद्रे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:41 AM

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात खासदारांनी आयुक्तांसोबत बैठक घेतली. या वेळी भाजप आमदार रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीस शिवसेनेचे पदाधिकारी विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, विजय साळवी, मनोज चौधरी आदी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या विषयावर आयुक्तांसोबत शिंदे यांनी चर्चा केली.

सध्या मनपा हद्दीत बेड किती उपलब्ध आहे, त्याचा आढावा घेण्यात आला. वाढती रुग्णसंख्या पाहता आणखी बेड लागू शकतात. त्याचबरोबर आर्ट गॅलरी आणि पाटीदार भवनसारखे कोविड सेंटर उभारण्याची गरज भासू शकते. केंद्राकडून राज्याला कोरोना लसीचा साठा कमी मिळत आहे. ही बाब लोकसभा अधिवेशनात खासदारांनी उपस्थित केली होती. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होताच लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरणासाठी आणखी केंद्रे वाढविता येऊ शकतात. लसीचा पुरेसा साठा महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यास उपलब्ध झाल्यास लसीकरणाचा वेग वाढविता येणार आहे. या गोष्टी लक्षात घेता आयुक्तांनी मनपा हद्दीत कोरोना लसीकरणाची केंद्रे वाढवावीत. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाणही वाढवावे, याकडे लक्ष वेधले आहे.

‘आरोग्य सुविधा वाढवा’ चव्हाण यांनी सांगितले की, कोराना लसीकरण केंद्रे वाढवावीत, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. त्यासाठी २०० जणांचा कर्मचारी वर्ग लागणार आहे. त्यासाठी तजवीज करून कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य सोयीसुविधा वाढवाव्यात, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.

------------------