ठाणे : मागील आठ महिन्यापासून प्रतिक्षेत असलेली कोरोनाची लस अखेर आली आहे. ठाणो महापालिकेच्या चार केंद्रावर या लसीची सुरवात झाली. घोडबंदर भागातील रोझा गार्डनिया येथे महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या पहिल्या महिला डॉक्टरला लस देण्यात आली. या लसीचे स्वागतही महापालिकेने आगळ्या वेगळ्या पध्दतीने केल्याचे दिसून आले. दुस-या मजल्यार्पयत जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तळ मजल्यावर रुग्णाची माहिती घेणो आणि दुसऱ्या मजल्यावर एका कक्षात लस दिली जात होती. तर दुस:या कक्षात रुग्णावर अर्धा तास देखरेख ठेवली जात होती. परंतु ऐतिहासिक लसीचे साक्षीदार होण्यासाठी येथे अनेकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे लस देत असतांना येथे सोशल डिस्टंसींगचा पुर्ता फज्ज उडाल्याचे दिसून आले. आयुक्त नियम पाळा अशी ओरड करीत असतांनाही येथील उपस्थितीतांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.ठाण्यातील चार केंद्रावर शनिवार पासून लसीकरणाला सुरवात झाली. प्रत्येक लाभाथ्र्याला मोबाईलवर मेसज करुन मगच येण्याची विनंती केली जात होती. परंतु शनिवारी पहिल्याच दिवशी या चारही केंद्राच्या ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले. या चारही केंद्रावर पहिल्या दिवशी ४०० जणांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानुसार सकाळी १०.५५ च्या सुमारास घोडबंदर भागातील रोझा गार्डनिया येथील केंद्रावर लसीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी महापालिकेच्या माध्यमातून तळ मजल्यापासून ते थेट दुसऱ्या मजल्यार्पयत विविध ठिकाणी पाय-यांवर रांगोळी काढण्यात आली होती. तसेच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत सोशल डिस्टेसींगचे पालन करीत खुच्र्याची रचना करण्यात आली होती. तर दुसऱ्या खोलीत लस दिली जात होती. तसेच बाजूला असलेल्या खोलीत लस घेतलेल्यांवर देखरेख ठेवली जात होती.यावेळी डॉ. वृषाली गौरवार यांना पहिली लस दिली जाणार होती. त्यामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी येथे अनेकांनी गर्दी केली होती. मिडियावाले देखील या ठिकाणी मोठय़ा संख्येने हजर होते. वृषाली यांनी लस देत असतांना त्यांच्या आजूबाजूला नुसता गराडा पडला होता. येथील स्टाफ तसेच सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नगरसेवकांसह त्यांच्या सोबत असलेल्या पदाधिका:यांनी देखील गर्दी केल्याचे दिसून आले. प्रत्येकाला आपण फोटोत यावे म्हणून इच्छा वाटत होती.दरम्यान दुसरीकडे आयुक्त लांब उभे होते. त्यांच्याकडून सोशल डिस्टेसींगचे पालन करा म्हणून आवाज दिला जात होता. परंतु कॅमेरे, आणि इतर बघ्यांनी तेथे गर्दी केल्याचे दिसत होते. विशेष म्हणजे लस देत असतांना आयुक्त, महापौर आणि इतर पदाधिकारी फोटोत यावेत म्हणूनही त्यांना कॅमे:यावाल्यांनी गळ घातली आणि मग अधिकची गर्दी लस घेणा:या डॉक्टर महिलेच्या आजूबाजूला झाल्याचे दिसून आले. अखेर इतिहासाचे साक्षीदार झाल्यानंतर येथील गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर टप्याटप्याने आणि सोशल डिस्टेसींगचे पालन करीत लस दिल्या जात असल्याचे दिसून आले.
Corona vaccination: इतिहासाचे साक्षीदार होताना विसरले सोशल डिस्टंसिंगचे भान, पहिल्या लाभार्थ्याला पाहण्यासाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 6:22 PM