अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी पुन्हा एकदा रविवारी विशेष लसीकरण मोहीम राबवली होती. तब्बल 650 लस्सी महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, या 650 लसींसाठी हजाराहून अधिक महिला रांगेत उभ्या होत्या. त्यामुळे अनेक महिलांच्या वाट्याला निराशा आली.
अंबरनाथ नगरपालिकेच्यावतीने रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यात एक हजार महिलांना लस देण्यात आली. अशाच प्रकारची विशेष महिला लसीकरण मोहीम पुन्हा एकदा आज रविवारी घेण्यात आली.
या मोहिमेत 650 लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र रात्रीपासूनच महिलांनी टोकन मिळवण्यासाठी रुग्णालयाबाहेर रांग लावली होती. ऑर्डनन्सच्या हॉस्पिटल पासून ते थेट केंद्रीय विद्यालयपर्यंत ही रांग गेली होती.
सकाळी आठ वाजता टोकन चे वाटप झाल्यावर अवघ्या 650 महिलांनाच टोकन उपलब्ध झाले. तर उर्वरित महिलांनी घोळका करून त्याठिकाणी टोकणची प्रतीक्षा केली. मात्र लसींच्या पुरवठा अल्प असल्याने पालिकेने उर्वरित महिलांना कोणत्याही प्रकारचे टोपण दिले नाहीत.
महिला विशेष लसीकरण मोहीम अंबरनाथ पालिकेने राबवली असली तरी त्याचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्य उल्हासनगर मधील महिला रांगेत उभ्या होत्या. त्यामुळे अंबरनाथ करांच्या वाट्याला निराशा आली.