शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यात आजचा दिवस पुरेल एवढीच लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 12:50 AM

ग्रामीण भागात अवघ्या तीन दिवसांचा साठा; लसीकरण करण्यासाठी ठिकठिकाणी झुंबड

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता कहर लक्षात घेऊन लसीकरण करणाऱ्यांची एकच झुंबड उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात गुरुवारी फक्त एक लाख २२ हजार ७२० लसींचा साठा शिल्लक आहे. यापैकी जिल्ह्यात सर्व सहा महापालिकांकडे शुक्रवारपर्यंत पुरेल एवढीच लस शिल्लक आहे. तर ग्रामीणमध्ये तीन दिवसांच्या लसीकरणाचा साठा आहे.जिल्ह्यात कोविशिल्ड लस पसंतीला उतरल्यामुळे ती घेण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक कल आहे.   कोव्हॅक्सिन लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे वास्तव दिसून आले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात गुरुवारपर्यंत ६० लाख ९० हजार ४८० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक पहिला डोस घेणारे असून काहींना दुसरा डोस दिलेला आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि शनिवार, रविवार दोन दिवस पूर्ण संचारबंदी लागू आहे. त्यामुळे या महामारीच्या चक्रव्युहातून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जिल्ह्यातील १८२ लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी झुंबड केली आहे. शहरी भागात शुक्रवारी पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे. तर ग्रामीण भागातील गावपाड्यांना तीन दिवसांच्या लसींचा साठा शिल्लक आहे.  सध्या जिल्ह्याभरातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील २९ लाख ७० हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यासाठी ६१ लाख ८० हजार ३६६ लसींचा पुरवठा होणे अपेक्षित आहे.  लसीकरणाचा पुरवठा जिल्ह्यात आजपर्यंत झालेला नाही. त्यामुळे शासन आदेशानुसार उपलब्ध लसींच्या साठ्यातूनच ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यामुळे लसीचा तुटवडा भासत आहे. यासाठी लवकरच टप्प्याटप्प्याने लसींचा पुरवठा होणार असल्याचे जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस