ठाणे : मागील दोन, तीन दिवस ठप्प असलेली लसीकरणाची मोहीम ठाण्यात पुन्हा एकदा सुरु झाली. परंतु सोमवारी लस घेण्यासाठी शहरातील विविध केंद्रावर पहाटे पासूनच लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी वादंग देखील झाल्याचे दिसून आले. यात जेष्ठ नागरीकांचे मात्र हाल झाल्याचे दिसून आले. त्यातही पहाटे पासून रांगेत उभे राहूनही अनेकांना लस मिळालीच नाही. ( Long queues for vaccinations for senior citizens, only 30% vaccinated so far)
मागील काही दिवसापासून ठाणो महापालिका हद्दीत लसीकरणाचा वेग मंदावल्याचे दिसून आले आहे. आठवडा भरात तीन ते चारच दिवस लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेने सुरु असल्याचे दिसून आले. मात्र मागील आठवडय़ातही लसीकरणाला खीळ बसल्याचे दिसून आले होते. आता या आठवडय़ात देखील लसीकरणाला खीळ बसल्याचेच दिसून आले आहे. मागील तीन दिवस ठाण्यात लसीकरण मोहीम ठप्प होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा लसीकरण मोहीम सुरु झाली. शहरासाठी केवळ १०५०० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यानुसार शहरातील तब्बल ५४ केंद्रावर लसीकरण मोहीम सुरु झाली होती. त्यामुळे लस घेण्यासाठी ठाणोकरांनी अगदी सकाळ पासूनच रांगा लावल्याचे दिसून आले. पहाटे पासूनच कोपरी येथील आरोग्य केंद्रावर तसेच शहरातील इतर केंद्रावर नागरीकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून आले. आपल्याला लस मिळावी म्हणून प्रत्येकाने पहिला येण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जिथे १०० लस सांगितल्या होत्या. त्याठिकाणी ७० लस असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे अनेक केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातही काही ठिकाणी टोकन नसलेल्यांना देखील रांगा न लावता लस दिली जात होती. त्यामुळे रांगेतील नागरीक संतप्त झाले होते. यामध्ये जेष्ठ नागरीकांचे हाल झाले. सकाळच्या सत्रत कडक उन्हाचा मारा या नागरीकांना सहन करावा लागला. तर दुपारी १२.३० पासून पावसाला सुरवात झाल्याने पावसाचा माराही नागरीकांना सहन कारवा लागला. त्यामुळे अनेक केंद्रावर नागरीकांनी नियोजनचा अभाव असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
आतापर्यंत केवळ ३० टक्केच लसीकरणदरम्यान ठाण्याची लोकसंख्या जवळ जवळ २५ लाखांच्या आसपास आहे. त्यानुसार जानेवारी पासून ते आतार्पयत महापालिका हद्दीत ३० टक्केच लसीकरण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही २३ टक्के हे पहिला डोस घेणाऱ्यांचे आणि ७ टक्के लसीकरण हे दुसरा डोस घेणा:यांचे झाले आहे. त्यानुसार आतार्पयत पहिला डोस ४ लाख ९ हजार ७० जणांना देण्यात आला आहे. तर दुसरा डोस १ लाख ३८ हजार १८९ जणांना देण्यात आला आहे. त्यानुसार आतार्पयत ६ लाख २८ हजार २६८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
मंगळवारी लसीकरण बंदठाणे शहरासाठी १०५०० लस प्राप्त झाल्या होत्या. ज्या एका दिवसापुर्तीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ९ हजार ३०० कोव्हीशिल्ड आणि १२०० कोव्हॅक्सीनचा साठा उपलब्ध झाला होता. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून सोमवारी एका दिवसात ५४ केंद्राच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले. त्यामुळे आता लसींचा साठा पुन्हा एकदा संपुष्टात आल्याने मंगळवारी शहरातील लसीकरण बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.