ठाणे : सोशल माध्यमांवर वृत्त वापरून तसेच स्क्र ीन शॉटचा वापर करून कोरोनाविषयी अफवा पसरवण्यात येत आहेत. यावर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. अफवा पसरवणाºयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गुरुवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या वेळी दिला आहे. तसेच संशयित अथवा रु ग्णाचे नाव उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी सामाजिक भान ठेवून कुणीही रु ग्णाचे अथवा संशयित व्यक्तीचे नाव उघड करू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
शासनाच्या सूचनेनुसार राज्यात अनेक ठिकाणी यात्रा, सामुदायिक कार्यक्र म, मोहिमा, शासकीय कार्यक्र म पूर्णपणे रद्द केले आहेत. विविध संस्थांनीदेखील पुढील किमान २५ दिवस शहरांमध्ये धार्मिक कार्यक्र म, मेळावे आयोजित करू नयेत, तसेच नागरिकांनी सामुदायिक कार्यक्र म, मोहिमा, मेळावे यांच्यामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणा दक्ष असून, नागरिकांनी भयभीत न होता सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये व तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, आवश्यकता असेल तरच प्रवास करावा, प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळल्यास प्रतिबंध करणे सहज शक्य आहे. आपत्तीच्या प्रसंगी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.मनोरुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. मनोरुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आदेश संबंधित डॉक्टर्स, नर्स आणि परिचर यांना दिले आहेत. तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रुग्णांनाही कोरोनाची माहिती आणि घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केल्याचे मनोरुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मकरंद पाटील यांनी सांगितले. कोरोनाने मुंबईत प्रवेश केल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर अफवांनाही उधाण आले आहे. शासनपातळीवरही आवाहन केले जात आहे. शासकीय रुग्णालयात कोरोनासंदर्भात माहिती दिली जात आहे. त्यात ठाण्यातील मनोरुग्णालयातही काळजी घेण्यासंदर्भातील सूचना दिल्या जात आहे. सध्या मनोरुग्णालयात ९०९ रुग्ण दाखल आहेत. दिवसाला ३५० ते ४०० तपासणीसाठी येतात. त्यांना भेटण्यासाठी ८०० ते १००० नातेवाइकांची वर्दळ असते. त्यादृष्टीने मनोरुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.रुग्ण वाढल्यास विशेष कक्षांमध्येही उपचार होणारकोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास महापालिकानिहाय तयार केलेल्या विशेष कक्षांमध्ये औषधोपचार केले जाणार आहेत. त्याचबरोबर तेथेच रुग्णांचे स्वब घेऊन पुढील तपासणीसाठी ते मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठवलेले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या आजाराची तपासणी करण्याची व्यवस्था शासनाने मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात केलेली असून, रु ग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सापडल्यास त्याला तेथे भरती करून उपचार केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईलगत मोठा जिल्हा असलेल्या ठाण्यात या व्हायरसची कोणतीही तपासणी यंत्रणा नसल्याने संशयित रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठवले जात आहे. तेथे त्यांची तपासणी केली जाते. ठाणे जिल्ह्यात अद्याप तरी एकही रुग्ण आढळलेला नाही; परंतु परदेशातून आलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची संख्याही ५६ इतकी झाली आहे. ते सर्व आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत. महापालिकानिहाय विशेष कक्ष तयार केले आहेत. तेथे विशेष डॉक्टर-नर्स आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यास या कक्षांमध्ये रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.