ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसह मृतांच्या संख्येत गुरुवारी समाधानकारक घट झाली. जिल्हाभरात ८५९ रुग्णांची नव्याने वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या दोन लाख चार हजार ५१३, तर २३ जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या पाच हजार १८१ झाली, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.
ठाणे शहरातील २१९ रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली शहरात १३५ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचे मृत्यू झाले आहे. उल्हासनगरला ४२ नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडीला २७ बाधित आढळले असून एक मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ११० रुग्णांच्या वाढीसह पाच मृत्यू झाले आहेत. अंबरनाथला २६ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरमध्ये ३३ रुग्ण सापडले असून दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही.
नवी मुंबईत ९२ टक्के रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबई : शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गुरुवारी २०२ रुग्ण वाढले असून २५४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के झाले आहे. सद्यस्थितीमध्ये २६१५ रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ८६८ झाला आहे.
रायगडमध्ये २०८ रुग्णांची नोंदरायगड जिल्ह्यात गुरुवारी २०८ दिवसभरात कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात ०९ जणांचा मृत्यू झाला तर २७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सद्यस्थितीत १८६५ रुग्णांवर उपचार सुरुआहेत.
वसई विरारमध्ये ४ रुग्णांचा मृत्यूवसई-विरार महापालिका हद्दीत गुरुवारी दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला तर १०४ नवीन रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात शहरात १५५ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्तही झाले आहेत. त्यामुळे शहरांत आता फक्त १०८८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.