ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वागतयात्रा आयोजकांची बैठक शुक्रवारी आयोजित केली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाच्या स्वागतयात्रा रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. उल्हासनगर येथील सिंधी समाजाची चेटीचंड यात्राही रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला असून, नवी मुंबईतील लेजेंड क्रिकेट सामना पाहण्यासाठी घेतलेल्या तिकिटाचे पैसे परत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि इतर भागांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येतात. ठाणे आणि डोंबिवली शहरात मोठ्या स्वागतयात्रा निघतात. यात शहरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण मोठ्या संख्येने सहभागी होतात. या यात्रांच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक संदेश देण्यात येतात. मात्र, कोरोना विषाणूचा शिरकाव राज्यासह ठाण्यातही झाला असून, या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या स्वागतयात्रांवर कोरोनाचे सावट असल्याचे चित्र होते. यंदाच्या स्वागतयात्रा होणार की नाही, अशी चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू झाली होती. असे असतानाच जिल्हाधिकाºयांनी शुक्र वारी जिल्ह्यातील सर्वच स्वागतयात्रा आयोजकांची तातडीची बैठक बोलविली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच स्वागतयात्रांचे आयोजक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हाधिकाºयांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य सर्वांसमोर मांडले. ठाण्यातही कोरोनाचा रु ग्ण आढळला असून या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शासकीय कार्यक्र म रद्द केले असून, ग्रंथोत्सवही रद्द केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्वागतयात्रेबाबतही असाच निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यास प्रतिसाद देत आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वेची स्वागतयात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सर्वच संस्थांनीही अशाचप्रकारे स्वागतयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पुढील वर्षी स्वागतयात्रांना परवानगी घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचे पोलीस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. काही आयोजकांनी दीपोत्सवाला परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, दीपोत्सवही करू नका, असे आवाहन नार्वेकर यांनी केले. त्यामुळे आयोजकांनी दीपोत्सवही रद्द करण्याचा निर्णय घेतला. डोंबिवली ग्रामीण भागात होणारी स्वागतयात्रा रद्द करून त्यासाठीचा जो काही खर्च होणार होता, तो खर्च या आजारावर मात करण्यासाठी शक्य असलेल्या उपाययोजनांवर केला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. ठाण्यातील कोपीनेश्वर न्यासची स्वागतयात्राही रद्द करण्यात आली असून, शहरातील उपयात्रा रद्द करण्यासाठीही आम्ही इतर संस्थांना आवाहन करणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे नवी मुंबई येथील क्र ीडा प्रेक्षागृहामध्ये सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत क्रि केट सामने सुरू आहेत. मात्र, आता सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. या सामन्याच्या तिकिटाचे पैसे परत दिले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले.ठाण्यातील काही खासगी शाळा बंदकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदेश नसतानाही ठाण्यातील काही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत पालकमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी दिली. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये म्हणून सरकारने विविध प्रकारे खबरदारी घेतली आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरीतल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिल्यावर ठाणे-मुंबईतल्या शाळा बंद ठेवणार की सुरू राहणार, याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र, ठाण्यातील खासगी सिंघानिया हायस्कूल, तसेच वसंतविहार स्कूल यांनी शाळा सोमवार, १६ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सिंघानिया शाळेने केजी ते दुसरी इयत्तेपर्यंतचे वर्ग १६ ते २८ मार्चपर्यंत बंद ठेवले आहेत.
वसंतविहार स्कूलनेही १६ मार्चपासून पुढील काही दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत विद्यार्थी आणि त्यांना ने-आण करण्यास येणाºया पालकांचा शाळेबाहेर मोठा वावर असतो. हेच लक्षात घेता मुलांच्या काळजीपोटी हा निर्णय घेतल्याचे सिंघानियाच्या मुख्याध्यापक रेवती श्रीनिवासन यांनी सांगितले. मात्र, शहरातील उर्वरित शाळा सरकारी आदेश येईपर्यंत चालू ठेवणार असल्याचे काही शाळांच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
डोंबिवलीच्या शोभायात्रेस २१ वर्षांनी ‘ब्रेक’
डोंबिवली : श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फे शहरात २१ वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेला यंदा कोरोनामुळे ‘ब्रेक’ लागला आहे. आधीच आयोजकांपुढे कोपर पूल बंद असल्याने यात्रा कशी काढावी, असा पेच होता. त्यावर तोडगा निघाला असताना आता कोरोनाच्या भीतीमुळे प्रथमच यात्रा रद्द करण्याची वेळ ओढावली आहे.स्वागतयात्रेच्या नियोजनासाठी आयोजकांनी अनेक बैठका घेतल्या होत्या. तसेच हॅण्डबिल, कार्यक्रम पात्रिका बनविल्या होत्या. या सर्वांवरील खर्च आता वाया गेला आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी होणारे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळे स्वागतयात्रेत सहभागी होणाºया संस्थांचा हिरमोड झाला आहे.
कल्याण संस्कृती मंच संचालित कल्याण विकास प्रतिष्ठानतर्फे काढण्यात येणारी स्वागतयात्राही रद्द करण्यात आली आहे. संस्थेतर्फे अद्याप स्वागतयात्रेत सहभागी होणाºया संस्थांची बैठक घेण्यात आली नव्हती. त्यामुळे तेथील संस्थांना स्वागतयात्रा रद्द झाल्याचा फारसा फटका बसलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना विषाणूमुळे जगासमोर संकट उभे राहिले आहे. नववर्ष स्वागतयात्रा रद्द झाल्यावर आता पुढे काय करायचे, यावर निर्णय घेण्यासाठी डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीची शनिवारी एक बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.