शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

Corona Virus News: संचारबंदीसाठी ठाणे पोलीस सज्ज: विनाकारण फिरणाऱ्यांवर राहणार करडी नजर

By जितेंद्र कालेकर | Published: April 14, 2021 11:50 PM

वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कलम १४४ चा भंग केल्यामुळे १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो.

ठळक मुद्दे कलम १४४ चा भंग केल्यास होणार कारवाईएसआरपीएफसह राहणार पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय फिरतांना आढळल्यास संबंधितांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत.राज्य शासनाने यापूर्वीच रात्रीची संचारबंदी आणि दिवसा जमावबंदीचे आदेश ४ एप्रिलपासून लागू केले होते. आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून संपूर्ण संचारबंदीसाठी कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळात तसेच ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकडयाही (एसआरपीएफ) तैनात केल्या आहेत. आयुक्तालयात एसआरपीएफच्या पाच कंपन्या (५०० जवान), ५०० होमगार्डस्, पोलीस मुख्यालयातील ७०० कर्मचारी याशिवाय, तीन हजार ५०० स्थानिक पोलिसांचा फौजफाटा खास संचारबंदीच्या बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. याशिवाय, वाहतूक शाखेचे ५०० कर्मचारीही दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्टमध्ये रस्त्यावर जागोजागी तैनात केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त वाहनांवर फिरणारे, मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणारे आणि अत्यावश्यक कामाचे नाव सांगून बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जागोजागी नाकाबंदी केली असून या सर्व ठिकाणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त नाकाबंदीचे नाक्यांवर अचानक तपासणी करणार आहेत.* काय होणार कारवाई-विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कलम १४४ चा भंग केल्यामुळे १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. जर तो एखाद्या वाहनातून जात असेल तर १७९ नुसार आदेशाचा भंग केल्यामुळे कलम २०७ प्रमाणे त्याच्याकडील वाहन जप्तीचीही कारवाई होऊ शकते.* तर अटकेचीही कारवाई होऊ शकते-संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचे कोणी आढळून आल्यास त्याची आधी खातरजमा केली जाणार आहे. तो जर रुग्णालय, मेडिकल, औषध निर्माण कंपनी किंवा वाहतूकीसाठी जात असेल किंवा सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, अधिस्वीकृती पत्रकार तसेच रुग्णालयीन कर्मचारी असल्याचे आढळले तर कोणतीही कारवाई होणार नाही. पण यापैकी काहीही नसतांना पोलिसांशी हुज्जत घातली तर गरज पडली तर त्याच्यावर अटकेचीही कारवाई केली जाऊ शकते, असे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.* ठाणे ग्रामीणमध्येही बंदोबस्त-ठाणे ग्रामीणमध्येही पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड, गणेशपूरी आणि शहापूर या विभागांमधील ११ पोलीस ठाण्यांच्या पातळीवर बंदोबस्त आहे. याठिकाणीही नाकाबंदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस