कल्याण - ‘नॅशनल अर्बन हेल्थ मिशन’ अंतर्गत असलेल्या नर्सना किमान वेतन दिले जात नसल्याने 192 नर्सनी आजपासून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालय आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढीचे लेखी आश्वासन द्या अन्यथा कामावर हजर होणार नाही असा इशारा या नर्सनी दिला आहे.
एनयूएचएम अंतर्गत असलेल्या 192 नर्स या कल्याण डोंबिवलीत 2015 पासून कार्यरत आहे. त्यांना दर महिन्याला 8 हजार 640 रुपये पगार दिला जातो. अन्य महापालिकांमध्ये हेच काम करणाऱ्यांना किमान वेतन दिले जाते. त्याचबरोबर वैद्यकीय भत्ते दिले जातात. कोविड काळात कोविड भत्ता दिला जातो. कल्याण डोंबिवली महापालिकेत किमान वेतन दिले जात नाही. सुरक्षेची साधने पुरविली जात नाहीत. कोविड भत्ता दिला जात नाही. 192 नर्स कोविड काळात वैद्यकीय सेवा देत आहे. साप्ताहीक सुट्टीही घेऊ दिली जात नाही. या प्रकरणी दाद मागण्यासाठी या सगळ्य़ांनी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. रात्री आठ वाजेपर्यंत आयुक्तांच्या भेटीसाठी नर्स थांबून होत्या. आयुक्त व्हीसीमध्ये असल्याने त्यांची भेट झाली नाही. आज पुन्हा या नर्स महापालिका मुख्यालयात आल्या. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन दिले गेले नाही. त्यांनी मुख्यालयातील आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोर्पयत लेखी आश्वासन दिले जात नाही. तोर्पयत कामावर हजर होणा नाही असा पावित्र घेतला आहे.
दरम्यान त्यांना एक नोटीस दिली आहे. ही नोटीस राष्ट्रीय अभियना संचालनालयाचे आयुक्त अनूप कुमार यादवी यांच्या सहीची आहे. कोविड साथ काळात अभियानांर्गत काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहणे आवश्यक आहे. 48 तासांत हे कर्मचारी हजर न झाल्यास त्यांच्या विरोधात कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. मात्र ही नोटिस 14 मे 2020 रोजी काढली आहे. त्याच नोटिसच्या आधारे कारवाई करण्याची तंबी महापालिका देण्याच्या तयारीत असल्याचे सूचित केले आहे. महापालिकेने अद्याप नोटीस काढलेली नाही. या आंदोलनकर्त्या नर्सची भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भेट घेतली आहे. त्यांनी सांगितले की, या विषयी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली आहे. कोविड प्रमाणे वेतन देण्याचे मान्य केले असल्याचे आयुक्तांनी मान्य केले असून त्याची लेखी ऑर्डर काढतील असे आश्वासीत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन'; भाजपाच्या 'या' नेत्याने पवारांचं समर्थन करत पडळकरांना सुनावलं
मोदी सरकारचा चीनला दणका! भारतात बंदी घातल्यानंतर TikTok म्हणतं...
...अन् चिमुकल्याच्या मृतदेहाला कवटाळत पित्याचा आक्रोश, मन सुन्न करणारी घटना
विशाखापट्टणम पुन्हा हादरलं! वायू गळतीमुळे दोन जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ